Nagpur Blast: SBL कंपनीतील स्फोटात १७ जणांचा मृत्यू, महिला कर्मचाऱ्याने सांगितलं धक्कादायक वास्तव

Nagpur Company Blast Update: नागपूरच्या कटोल तालुक्यातील एका कंपनीत आज भीषण स्फोट होऊन १७ महिला कामगारांचा मृत्यू झाला. तर १८ कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nagpur Blast: SBL कंपनीतील स्फोटात १७ जणांचा मृत्यू, महिला कर्मचाऱ्याने सांगितलं धक्कादायक वास्तव
Nagpur BlastSaam Tv
Published On

नागपूरच्या काटोल तालुक्यातील रावळगावमध्ये एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. एसबीएल एनर्जी लिमिटेड या खाणकामासाठी आणि औद्योगिक स्फोटकांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट होऊन १७ जणांचा मृत्यू झाला तर १८ जण गंभीर जखमी झाले. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्फोटामध्ये मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे झाल्यामुळे मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. या स्फोटानंतर कंपनीविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिला कामगाराने कंपनीमध्ये जबरदस्ती काम करून घेतलं असल्याची माहिती सांगितली.

सुवर्णा खंडाते ही महिला कामगार या कंपनीतच काम करते. घटना घडली त्यावेळी ती त्याठिकाणीच होती. कंपनीच्या गेटवर सुपरवायझरने तिला अडवले होते. त्याचवेळी हा स्फोट झाल्याचे तिने सांगितले. 'मी या ठिकाणच्या एका कंपनीत काम करते. पण मला माझ्या सुपरवायझरने शिवीगाळ करत प्लांटच्या बाहेर हाकलले. मी गेटवर असताना स्फोटाचा मोठा आवाज आला. काल मी कामावर आली नव्हती त्यामुळे त्याने मला शिवीगाळ केली. याठिकाणी दररोज ४० डब्बे तयार करण्याचे आम्हाला टार्गेट असते. मात्र आमच्याकडून जबरदस्तीने ५० डब्बे तयार करून घेतले जातात.याठिकाणी सहा ते अडीच वाजेपर्यंत काम असते. कुणाला १२ तर कुणाला १३ हजार पगार दिला जातो.', अशी धक्कादायक माहिती या महिला कामगाराने सांगितली.

Nagpur Blast: SBL कंपनीतील स्फोटात १७ जणांचा मृत्यू, महिला कर्मचाऱ्याने सांगितलं धक्कादायक वास्तव
Nagpur Company Blast : नागपुरातील खासगी कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट; एकाचा जागीच मृत्यू, ७ कामगार जखमी

घडलं असं की, एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये आज सकाळची शिफ्ट सुरू झाली. महिला ६ च्या शिफ्टला आल्या होत्या. कंपनीमध्ये ३५ महिला कामगार काम करत होत्या. त्याचवेळी अचानक मोठा स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. या स्फोटामध्ये कंपनीत काम करणाऱ्या अनेक महिलांचा जागीच मृत्यू झाला. मृतदेहाचं तुकडे झाले. तर १८ महिला गंभीर जखमी झाला. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्खळी धाव घेत तपास सुरू केला. या कंपनीत काम करणाऱ्या महिलांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत एकच आक्रोश केला.

Nagpur Blast: SBL कंपनीतील स्फोटात १७ जणांचा मृत्यू, महिला कर्मचाऱ्याने सांगितलं धक्कादायक वास्तव
Nagpur Blast : स्फोटाने नागपूर हादरले, १७ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले...

नागपूरच्या रावळगाव परिसरातील कंपनीत झालेल्या स्फोटामध्ये १७ महिला कामगारांचा मृत्यू झाला. या महिला कामगाराच्या कुटुंबीयांना सरकारकडून ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेप्रकरणी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. कंपनीकडून देखील मृत कामागारांच्या कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे.

Nagpur Blast: SBL कंपनीतील स्फोटात १७ जणांचा मृत्यू, महिला कर्मचाऱ्याने सांगितलं धक्कादायक वास्तव
Nagpur Blast : नागपूरमध्ये SBL कंपनीत स्फोट, १२ जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com