Shruti Vilas Kadam
ग्रहणकाळात अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये, अशी पारंपरिक समज आहे. आधीच शिजवलेल्या अन्नावर तुळशीचे पान ठेवतात.
विशेषतः सूर्यग्रहणाच्या वेळी थेट सूर्य पाहणे टाळावे. डोळ्यांना हानी होऊ शकते.
ग्रहणकाळात लग्न, मुहूर्त, नवीन कामाची सुरुवात यांसारखी शुभ कार्ये टाळली जातात.
परंपरेनुसार गर्भवती महिलांनी धारदार वस्तू वापरणे किंवा बाहेर जाणे टाळावे, अशी समज आहे.
ग्रहणाच्या वेळी झोपणे अशुभ मानले जाते. त्याऐवजी मंत्रजप किंवा प्रार्थना करतात.
ग्रहणकाळात मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात. नियमित पूजा ग्रहण संपल्यानंतर केली जाते.
ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घर स्वच्छ करणे आणि नंतरच अन्न ग्रहण करणे योग्य मानले जाते.
(टिप: सदर माहिती ही वाचक्यांच्या माहितीसाठी आहे. साम टिव्ही याला दुजोरा देत नाही)