Kalyan Saam Tv News
मुंबई/पुणे

Kalyan News: मुंबई लोकलमध्ये राडा, धक्का लागला म्हणून ३ जणांवर चाकूने हल्ला

Kalyan Dombivli Local Train Attack: धक्का लागला म्हणून तरूणाने तीन प्रवाशावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये तिन्ही प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Bhagyashree Kamble

मुंबई लोकलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. धक्का लागला म्हणून एका तरूणानं तीन प्रवाशांवर चाकूने सपासप वार केले आहेत. यामध्ये तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून, आरोपी जियाची चौकशी सुरू आहे.

कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. लोकलमध्ये धक्का लागला म्हणून वाद झाला होता. याचदरम्यान, मुंबईत राहणाऱ्या १९ वर्षीय शेख जिया हुसेन या तरूणाला राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात खिशातला चाकू काढून तीन प्रवाशांवर हल्ला केला.

अक्षय वाघ, हेमंत काकरिया , राजेश चांगलानी असे जखमी प्रवाशांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

नेमकं घडलं काय?

कल्याणवरून दादरला जाणाऱ्या ९:४७ जलद लोकलमध्ये हल्ल्याची घटना घडली. एकाचा धक्का लागण्यावरून प्रवाशांमध्ये वाद झाला होता. रागाच्या भरात १९ वर्षीय तरूण शेख जिया हुसेन यानं खिशातला चाकू काढला. नंतर भर ट्रेनमध्ये त्यानं ३ जणांवर सपासप वार केले. वार केल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.

माहिती देण्यात आल्यानंतर प्रवाशांनी आरोपी जिया हुसेन शेखला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं. आरोपीला बेड्या ठोकल्यानंतर त्याची चौकशी पोलीस करीत आहेत. या प्रकरणानंतर काही वेळ कल्याणहून दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई नाशिकमध्ये दाखल

Relationship Tips: सारखं भांडण होतं; नातं घट्ट करण्यासाठी जोडीदारानं कराव्यात या खास गोष्टी

Fake Notes : नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीन जाणांविरोधात गुन्हा दाखल

Train Ticket Conformation Tips : दिवाळीला गावी जायचंय, पण तिकीट कन्फर्म नाही, 'या' टिप्स करा फॉलो

निवडणूक आयोगाला 2 लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा जोरदार दणका, काय आहे प्रकरण? VIDEO

SCROLL FOR NEXT