Kalyan- Dombivli News Saamtv
मुंबई/पुणे

Kalyan News: शाळा, महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्या जेसीबीने जमिनदोस्त; धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत

Kalyan- Dombivli News: कल्याण डोंबिवली महापालिका क प्रभाग व कल्याण बाजारपेठ पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या पानाच्या टपऱ्या जेसीबीनेच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या.

Gangappa Pujari

अभिजीत देशमुख, कल्याण|ता. २५ जानेवारी २०२४

Kalyan Breaking News:

शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असतानाही सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र कल्याण डोंबिवली परिसरात दिसून येत आहे. यावर कल्याण पालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क प्रभाग व कल्याण बाजारपेठ पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करत शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या पानाच्या टपऱ्या जेसीबीनेच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या.

महाराष्ट्र शासन व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा व महाविद्यालयाच्या 100 मीटरच्या परिघात, विडी, तंबाखू, गुटखा यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आहे. असे असताना शहरातील अनेक शाळा, महाविद्यालय परिसरात सर्रास तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.

या पार्श्वभूमीवर कल्याण (Kalyan) डोंबिवली महापालिका क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे व कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या पथकाने गोविंदवाडी, दुर्गाडी ,मोहिंदर काबुल सिंग,वल्लीपिर रोड शाळांच्या परिसरात असलेले पान टपर्यावर धडक कारवाई करत जेसीबीने या टपऱ्या जमीनदोस्त केल्या.

धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत...

दरम्यान, या धडक कारवाईने शाळा, महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्या आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी पोलीस आणि महापालिकाच्या या धडक कारवाईचे स्वागत केले आहे. (Latest Marathi News)

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT