Kalyan Crime
Kalyan CrimeSaam Digital

Kalyan Crime: पाळत ठेवून रेल्वे स्थानकावर चोरायचे प्रवाशांच्या बॅग, पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या

Kalyan Crime News: रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची बॅग चोरणाऱ्या दोन भावांचा कल्याण रेल्वे पोलिसांनी भांडाफोड केलाय . दोन भावांमधील एकाला रेल्वे पोलिसांनी सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत.
Published on

Kalyan Crime

रेल्वे स्थानकावर गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची बॅग चोरणाऱ्या दोन भावांचा कल्याण रेल्वे पोलिसांनी भांडाफोड केलाय . दोन भावांमधील एकाला रेल्वे पोलिसांनी सापळा रचत बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद फिरोज मन्सुरी असे या सराईत चोरट्याचे नाव असून त्याचा भाऊ मोहम्मद नसरूल मन्सुरी फरार झाला आहे. हे दोन्ही भाऊ सराईत गुन्हेगार असून दोघांविरोधात रेल्वेच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.

तीन दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरवर तिकीट काढणाऱ्या एका रेल्वे प्रवाशाची बॅग चोरट्याने चोरली होती. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला . कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला . तांत्रिक तपास ,सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्याच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या चोरट्यांची ओळख पटवली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Kalyan Crime
Pune Crime News: ऑनलाईन हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, राजस्थानी अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांची कारवाई

मोहम्मद फिरोज मन्सूरी व मोहम्मद नसरूल मन्सूरी या दोन चोरट्यांची नावे निष्पन्न झाली हे दोघे सख्खे भाऊ असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली . फिरोज अन्सारी डोंबिवली जवळील पलावा येथे येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली . पलावा परिसरात रेल्वे पोलिसांनी सापळा रचत मोहम्मद फिरोज मन्सूरी याला अटक केली तर त्याचा भाऊ मोहम्मद नसरूल मन्सूरी हा पसर झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत .हे दोघे भाऊ सराईत गुन्हेगार आहेत रेल्वे प्रवाशांची बॅग चोरण्यात त्यांचा हातखंडा आहे . या दोघांविरोधात कल्याण ,कुर्ला, वसई ,पनवेल ,बांद्रा रेल्वे पोलीस ठाण्यात बॅग चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

Kalyan Crime
Bengaluru Crime News:आंतरजातीय प्रेमसंबंधांना विरोध, भावानेचे केली बहिणीची हत्या; लेकीला वाचवताना आईचाही मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com