Kalyan Crime saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime: लुटण्याच्या इराद्याने ट्रक चालकाची निर्घृण हत्या; अवघ्या १८ तासात हल्लेखोरांना अटक

Kalyan Truck Driver Death Case Update: कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौकात ट्रक चालकाची हत्या करण्यात आली होती.

Gangappa Pujari

अभिजित देशमुख, प्रतिनिधी

Kalyan Crime News:

कल्याणच्या दुर्गाडी पुलावर एका ट्रक चालकाची दोघांनी निर्घृण हत्या केल्याची आली होती. सोमवार (२५, सप्टेंबर) रोजी घडलेल्या या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी आता महत्वाची अपडेट समोर आली असून दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण (Kalyan) पश्चिमेतील दुर्गाडी चौकात ट्रक चालक भोला कुमार महतो याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. गाडीचा बोल्ट खाली पडल्याने ट्रकचालक भोला कुमार याने दुर्गाडी ब्रीजवर गाडी उभी केली. गाडी चेक करीत असताना दोन तरुण एका दुचाकीवरुन त्याच्याकडे आले.

दोघांनी ट्रक थांबविल्याने आमच्या गाडीचे नुकसान झाले. आमच्या गाडीची नुकसान भरपाई दे.. असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. मात्र ट्रकचालकाने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांपैकी एकाने धारदार शस्त्राने भोलावर वार केले. या हल्ल्यात भोला याचा जागेवर मृत्यू झाला.

याप्रकरणी कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु केला. अखेर १८ तासांच्या आत दोन्ही आरोपींना वांद्रे येथून अटक करण्यात आली आहे. ट्रक चालकाची हत्या करुन दोघेही अजमेर जाण्याच्या तयारीत होते. त्याच दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT