Ganapati Visrjan 2023: मुंबई - पुणे आणि मुंबई- गोवा महामार्गावर अवजड वाहनांना नो एन्ट्री; कधी अन् किती तास राहणार बंद?

Ananth Chaturthi 2023: गणेश विसर्जन काळात महामार्गावर होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Ananth Chaturthi 2023
Ananth Chaturthi 2023Saamtv

Ganapati Festival 2023:

गेल्या आठवडाभरापासून सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. गणपतीसाठी चाकरमान्यांची गावी ये- जा वाढली असून यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीही होत आहे. या वाहतुक कोंडीचा विचार करत ३ दिवसानंतर असलेल्या गणेश विसर्जन काळात महामार्गावर होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Ananth Chaturthi 2023
Bhandara Ganesh Visrajan : बाप्पाच्या विसर्जनासाठी भंडा-यात 12 ठिकाणी कृत्रिम कुंड, 50 पालिका कर्मचारी तैनात

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणपती विसर्जनाला (Ganapati Visrjan) अवघे तीन दिवस उरले आहेत. २८ सप्टेंबरला होणारे गणपती विसर्जन तसेच ईद सणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतुकीतही मोठे बदल केले आहेत.

पुणे- मुंबई महामार्ग (Pune- Mumbai Highway) तसेच मुंबई- गोवा महामार्गावरील (Mumbai- Goa Expressway) वाहतुक कोंडी लक्षात घेवून या रस्त्यांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. २७ तारखेला मध्यरात्री १२ वाजल्यापासून दोन्ही महामार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

ही प्रवेश बंदी २९ तारखेला रात्री १२ वाजेपर्यंत असणार आहे. गणपती विसर्जनानिमित्त राज्यभर बाप्पांच्या मिरवणुका निघतात, त्यामुळे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच या दिवशी प्रवास करणाऱ्या अवजड वाहनांना जुन्या मार्गांचा पर्याय असणार आहे. (Latest Marathi News)

Ananth Chaturthi 2023
Pune Accident: संसार सुरु होण्याआधीच मोडला! देवदर्शनाला जाताना रिक्षा विहिरीत कोसळली; नवदाम्पत्यासह तिघांचा मृत्यू

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com