Bhandara Ganesh Visrajan : बाप्पाच्या विसर्जनासाठी भंडा-यात 12 ठिकाणी कृत्रिम कुंड, 50 पालिका कर्मचारी तैनात

या विसर्जन सोहळ्यासाठी पालिकेने सर्वताेपरी तयारी केली आहे.
Bhandara, Bhandara Ganesh Visrajan
Bhandara, Bhandara Ganesh Visrajansaam tv

- शुभम देशमुख

Bhandara Ganpati Utsav : भंडारा पालिका प्रशासन गणेश विसर्जनासाठी सज्ज झाले आहे. नैसर्गिक स्त्राेतात हाेणारे प्रदुषण टाळण्यासाठी शहर व परिसरात तब्बल 12 कृत्रिम कुंडाची पालिकेने निर्मिती केली आहे. तसेच विसर्जन स्थळी 50 कर्मचारी तैनात केले आहेत.  (Maharashtra News)

Bhandara, Bhandara Ganesh Visrajan
Tadoba Online Booking : ताडोबा ऑनलाईन बुकिंगचा मार्ग माेकळा, उद्यापासून करा नाेंदणी; जाणून घ्या नवी वेबसाईट

लाडक्या गणरायाच्या निरोपासाठी भंडारा पालिकेने विशेष तयारी केली आहे. विसर्जनासाठी स्वच्छता, पाणी, सर्चलाईट, लाईफगार्ड निर्माल्यस्थळ व कृत्रिम कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Bhandara, Bhandara Ganesh Visrajan
Gadchiroli : गडचिराेली पाेलीसांची माेठी कामगिरी, नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; पुरून ठेवलेली स्फाेटके जप्त

अनंत चतुर्दशीला (anant chaturdashi) सर्वच घरातील बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शहरात विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सहा ठिकाणी विसर्जन स्थळावर पालिका प्रशासनाने सज्ज आहे.कारधा नदीवर 4 चार टॅंक,मिस्किन गार्डन येथे 2,खांब तलाव येथे 2,पिंगलाई माता मंदिर येथे 2,प्रगती कॉलोनी मैदान येथे 2 असे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल 12 कृत्रिम टॅंक विसर्जनासाठी (ganeshotsav) लावण्यात आले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com