saptashrungi building  Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : सप्तश्रृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर, ६ जणांचा मृत्यू, अनेकांचे संसार उद्धवस्त

saptashrungi building slab collapse News : सप्तश्रृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर आलीये. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

कल्याणमधील सप्तश्रृंगी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. इमारतीचा स्लॅब कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. या दुर्घटनेतील मृत आणि जखमींचे नावे समोर आली आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्घटनेत ६ जणांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

कल्याण पूर्व भागात असलेली सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात दीड वर्षीय मुलीचाही समावेश आहे. प्रमीला साहू (५८), नामस्वी शेलार (१.५) सुनीता साहू (३७), सुजाता पाडी (३२), सुशीला गजर (७८), व्यंकट चव्हाण (४२) अशी मृतांचे नावे आहेत.

सप्तश्रृंगी इमारतीचा स्लॅब कोसळलेल्या घटनेत ६ जण जखमी झाले आहेत. त्यांचीही नावे समोर आली आहेत. अरुणा रोहिदास गिरणारायन (48), शरवील श्रीकांत शेलार (04), विनायक मनोज पाधी (4.5), यश क्षीरसागर (13), निखिल खरात (27) श्रद्धा साहू (14) अशी जखमींचे नावे आहेत.

ढिगाऱ्याखालून १२ जणांना काढलं बाहेर

कल्याण पूर्व चिकणीपाडा परिसरात असलेल्या चाळीस वर्ष जुन्या सप्तशृंगी पाच मजली इमारतीच्या चौथ्या माळ्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडली. सप्तश्रृंगी इमारतीचा चौथ्या माळ्यावरील स्लॅब मंगळवारी तळमजल्यापर्यंत कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग दल आणि केडीएमसीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले. या दरम्यान अग्निशमन दलाने 12 जणांना बाहेर काढण्यात आले. त्यामधील दीड वर्षाच्या मुलीसह चार महिला आणि एका इसमाचा मृत्यू झाला .

सप्तश्रृंगी इमारतीत 50 कुटुंब राहत होते. या दुर्घटनेत 10 जण इमारतीमध्ये अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि केडीएमसीचं पथक, पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर या इमारतीमधून १२ जणांना बाहेर काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आपला DNA शेतकऱ्याचा_मी आतापर्यंत कधीही शेतकरी विरोधी भूमिका घेतली नाही : विखे पाटील

Maharashtra Politics: जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा|VIDEO

Ladki Bahin Yojana eKYC Date: लाडकी बहीणींना eKYC कधीपर्यंत करता येईल?

Hair Growth Tips: केस गळणे ३० दिवसात थांबवा, ट्राय करा न्यूट्रिशनिस्टने सांगितलेले 'हे' हेल्दी फूड

शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

SCROLL FOR NEXT