Jyoti Malhotra : पाकिस्तानची गुप्तहेर ज्योती भाजप कार्यकर्ती? काय आहे व्हायरल फोटोमागचं सत्य? VIDEO

Jyoti Malhotra Latest News : पाकिस्तानची गुप्तहेर असल्याचा आरोप असलेली ज्योती भाजप कार्यकर्ती असल्याचा दावा केला जात आहे. तिचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यावरुन सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.
Jyoti Malhotra News
Jyoti Malhotra Saam tv
Published On

ज्योती मल्होत्रा...याच सुंदर चेहऱ्याआड हिचे भारताविरोधात सगळे कारनामे सुरू होते. भारतात राहून पाकिस्तानचं काम करणारी ही ज्योती भाजपची कार्यकर्ती असल्याचा असा दावा केला जातोय...तिचे फोटोही व्हायरल करण्यात आलेयत...डोक्यात भाजप चिन्ह असलेली टोपी आणि गळ्यात गमछा...फोटो पाहून तुम्हीही म्हणाल की ही भाजपचीच कार्यकर्ती आहे...यासोबत आणखी एक फोटो व्हायरल होतोय.

यामध्येही आपची टोपी आणि गमछा घातलेला दिसतोय...मात्र, खरंच ही ज्योती भाजपची कार्यकर्ती आहे का...? ती भाजपसाठी काम करतेय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

Jyoti Malhotra News
Fact Check : पाकिस्ताननं भारताचं राफेल पाडलं? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं की, भारताशी गद्दारी करणारी ज्योती मल्होत्रा ही भाजपची कार्यकर्ती आहे.तिने आपसाठीही काम केलंय. डोक्यावर टोपी आणि गळ्यात गमछा घातलेला हा फोटो पाहा'.

हे ज्योतीचे दोन फोटो व्हायरल होतायत. काहींनी तर हे फोटो पाहून संताप व्यक्त केलाय...तर काही लोक भारतीय जनता पक्षालाही ट्रोल करतायत...मात्र, ही ज्योती खरंच भाजपची कार्यकर्ती आहे का...? तिने भाजपात प्रवेश केलाय का...? याची आम्ही पडताळणी केली...याबाबत आम्ही तिच्या पोस्ट पाहिल्या...तसंच भाजपशीही संपर्क साधला...यासोबतच आम्ही या फोटोंची नीट पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

Jyoti Malhotra News
Population Facts: जगात सर्वाधिक महिलांची संख्या असलेला देश कोणता? आकडेवारी पाहून तुम्हीही थक्क व्हाल

व्हायरल सत्य काय?

ज्योती मल्होत्रा ही भाजप, आपची कार्यकर्ती नाही

भाजपचा गमछा, टोपी घातलेला फोटो AI निर्मित

ज्योतीने भारताशी गद्दारी केल्याने सध्या अटकेत

ज्योती ही युट्यूबर असून ती पाकिस्तानसाठी काम करायची

Jyoti Malhotra News
Thane Water Supply : पाणी जपून वापरा! ठाण्यात बुधवारी पाणीबाणी; कोण कोणत्या भागात पाणीपुरवठा राहणार बंद?

ज्योतीने युट्यूबच्या नावाखाली भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवत होती...तिचा हा सगळा कारनामा उघड झाला आणि आता ती जेलमध्ये शिक्षा भोगतेय...तिच्या वाईट कृत्याची तिला शिक्षा मिळेलच...मात्र, आमच्या पडताळणीत ज्योती ही भाजपची कार्यकर्ती होती हा दावा असत्य ठरलाय...सध्या देशभरात ज्योतीच्या गद्दारीच्या बातम्या सुरू असल्याने एआयच्या माध्यमातून निर्मित केलेला हा फोटो व्हायरल केला जातोय...त्यामुळे तुम्ही अशा फोटोंवर विश्वास ठेवू नका..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com