Kalyan Badlapur 3rd and 4 th line Status: कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या मार्गिकेचा मोठा अडथळा दूर झाला आहे. या दोन मार्गिका उभारण्याला वनविभागाने रेल्वेला मंजुरी दिली आहे. वनविभागाच्या निर्णयामुळे या मार्गिकेच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या 'एमयूटीपी ३ अ'मध्ये कल्याण ते बदलापूर तिसरी-चौथी मार्गिका प्रकल्पाचा समावेश आहे या प्रकल्पात कल्याण ते बदलापूर रेल्वे स्टेशनदरम्यान ही तिसरी आणि चौथी मार्गिका बनविण्यात येणार आहे.
कल्याणच्या पुढे प्रवाशांची संख्या वाढल्याने या मार्गावरील ट्रेनमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. यामुळे या मार्गावरील प्रवाशांकडून ट्रेनची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. तर कल्याणच्या पुढे केवळ दोन मार्गिका आहेत. त्यामुळे प्रवाशांकडून आणखी दोन मार्गिका वाढविण्याचा प्रस्ताव होता. या दोन्ही मार्गिकेवरून एकाच वेळी लोकल , मालगाडी, एक्सप्रेस देखील धावते. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्यांना चाकरमान्यांना प्रवाशांचा जास्तीचा वेळ जातो. या दोन मार्गिका झाल्यास प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाद्वारे कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचं काम सुरू आहे. तर हे काम डिसेंबर २०२१ पासून या मार्गिकेवरील जमिनी संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दोन मार्गिकेसाठी एकूण १३.६ हेक्टर जमीनीची गरज आहे. या मार्गिकेत एकूण दहा गावांची जमीन आहे.
या जमिनीसाठी आतापर्यंत १३४.६४ कोटी रुपये देण्यात आले आहे. या प्रकल्पात ४९ नवीन उड्डाणपुल बनविण्यात येणार असून यापैकी ४४ उड्डाणपुलांना मंजुरी मिळाली आहे. तर २५ उड्डाणपुलांचं काम सुरू करण्याला 'कमिश्नर ऑफ रेल्वे सेफ्टी'ने मंजुरी दिली आहे. या उड्डाणपुलांसाठी लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत.
या मार्गिकेचं ड्रोन मॅपिंगच्या माध्यमातून प्राथमिक सर्व्हे आणि इंजिनियरींग सर्व्हे करण्यात आला आहे. या प्रस्तावित मार्गिकेचं अलाइनमेंट देखील अंतिम झालं आहे. या मार्गिकेवरील विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या स्टेशनसाठी 'जनरल अरेंजमेंट ड्राँइग' (GAD) बनविण्यात आलं आहे. अशाच प्रकारे 5 ROB ची डिझाइन देखील तयार आहे. यातील ४ डिझाइनला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.