kalyan Accident saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Accident : कल्याणमध्ये विचित्र अपघात; दुचाकीवरून रस्त्यावर पडल्यानंतर तरुण डंपरच्या चाकाखाली सापडला

Horrific Road Accident in Kalyan: कल्याणच्या पुणे लिंक रोडवरील विजय नगर येथे दुचाकी आणि डंपरच्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू, एक जखमी. अपघातगस्त उतारावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरतेय.

Bhagyashree Kamble

कल्याण पूर्वेकडील पुणे लिंक रोडवर पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. विजय नगर परिसरात ओव्हरटेक करताना दुचाकीची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिलिंडरच्या गाडीला धडक बसली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोघे रस्त्यावर फेकले गेले आणि त्याचवेळी पाठीमागून आलेल्या डंपरचे चाक एका दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेले. यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

कल्याण पूर्वेतील विजय नगर परिसरात अपघाताचे सत्र सुरूच आहे. पुणे लिंक रोडवर आणखी एका अपघाताच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दुचाकीचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर, एक गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

नेमकं घडलं काय?

विजय नगर परिसरात भरधाव दुचाकीस्वार डंपरला ओव्हरटेक करत होता. दरम्यान, ओव्हरटेक करत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिलिंडरच्या गाडीला जोरदार धडक बसली. या धडकेमुळे दुचाकीवरील दोघे रस्त्यावर फेकले गेले. दरम्यान, त्याचवेळी पाठीमागून वेगाने डंपर आली. डंपरचे चाक एका दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, दुसरा तरूण गंभीर जखमी आहे.

गंभीर अवस्थेतील तरूणाला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. हा अपघात विजय नगर येथील उतारावर घडला असून, या ठिकाणी यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा उतार अपघाताचा हॉटस्पॉट बनलं असल्याचं बोललं जात आहे.

स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी प्रशासनाकडे या ठिकाणी तातडीने अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेषतः स्पीड ब्रेकर, सीसीटीव्ही, सिग्नल यंत्रणा तसेच वाहतूक नियंत्रक यंत्रणा त्वरित कार्यान्वित करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO

Maharashtra Live News Update : शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची पुणे येथे जाहीर सभा

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

Gold vs Diamond Mangalsutra: कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र दिसेल अधिक रेखीव?

लाडक्या बहिणींनो कमळाला मदत करा, मगच नवऱ्याला जेवण वाढा; भाजपच्या महिला मंत्र्याचा अजब सल्ला

SCROLL FOR NEXT