CM VIDEO: तरुणाचा कारनामा, चक्क मुख्यमंत्र्यांचा अश्लील AI व्हिडिओ व्हायरल केला; नंतर...

CM Majhi’s Morphed Video: ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांचा मॉर्फ अश्लील व्हिडिओ फेसबुकवर शेअर केल्याप्रकरणी रायगडामधून किशोर कौशल्य याला अटक. सायबर पोलिसांनी तपास करून व्हिडिओ हटवला.
odisha CM
odisha CMSaam TV News
Published On

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांचा आक्षेपार्ह आणि मॉर्फ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी एक तरुणाला अटक केली आहे. गुन्हे शाखेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, एका नागरिकाने या व्हिडिओबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री माझी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ जाणूनबुजून तयार करण्यात आला होता.

किशोर कौशल्य असे आरोपीचे नाव आहे. त्याला रायगडा जिल्ह्यातून अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांचा मॉर्फ केलेला व्हिडिओ तयार केला. खरा वाटावा म्हणून त्याने एआयचा वापर केला. नंतर अश्लील व्हिडिओ व्हायरल केला. ओडिशामधील एका नागरिकाने यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

odisha CM
Shocking: शारीरिक संबंध ठेवताना रूमचे पडदे लावायला विसरले; ५ स्टार हॉटेलमधला व्हिडिओ व्हायरल

तक्रार मिळताच सायबर क्राइम युनिटने जलद तपास सुरू केला. सुरूवातीला फेसबुक मेटाशी संपर्क साधण्यात आला. तसेच व्हिडिओ काढून टाकण्यास सांगितलं. यानंतर फेसबुकने तात्काळ आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढून टाकला.

तपासादरम्यान, आरोपीचं नाव किशोर कौशल्य असल्याचं समोर आलं. तो रायगडा जिल्ह्यातील चांडाली पोलीस स्टेशन परिसरातील केउतागुडा स्टेशन साही येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. तो एका खासगी कंस्ट्रक्शन कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

odisha CM
Sanjay Raut: 'बेगानी शादी में ठाण्याच्या अब्दुल्लाचं काय काम?' राज-उद्धव युतीवरून राऊतांनी शिंदेंना सुनावलं

किशोरने आधी आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला. नंतर फेसबुकवर शेअर केला. हा व्हिडिओ खरा वाटावा यासाठी त्याने एआयचा वापर केला. आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला अनेक गंभीर कलमांखाली अटक करण्यात आली आहे. त्याला आज भुवनेश्वर येथील एसडीजेएम न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com