Thane Kalwa Hospital Saam tv
मुंबई/पुणे

Thane Kalwa Hospital: कळवा रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्युप्रकरणी चौकशी समिती गठीत; डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई?

Thane Kalwa Hospital: आरोग्य सेवा आयुक्त या समितीचे अध्यक्ष असून या समितीत जिल्हाधिकारी, ठाणे महानगर पालिका, जिल्हा शल्यचिकित्सा असे एकूण ९ जणांचा समावेश आहे.

साम टिव्ही ब्युरो

Thane Kalwa Hospital: ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. या प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून चौकशीसाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य सेवा आयुक्त या समितीचे अध्यक्ष असून या समितीत जिल्हाधिकारी, ठाणे महानगर पालिका, जिल्हा शल्यचिकित्सा असे एकूण ९ जणांचा समावेश आहे. (Latest Marathi News)

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ठाणे येथील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या २४ तासांत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, समितीच्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आदेशानंतर कळवा रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावर चौकशी नेमण्यात आली आहे. या समितीमध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी, महानगर आयुक्त, मुंबईचे आरोग्य सेवा संचालक, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक, राज्यस्तर आरोग्य सेवा सहसंचालक, सहायक संचालक (वैद्यकीय आरोग्य देखभाल दुरुस्ती पथक), भिषकतज्ज्ञ, ठाणे मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक यांचा सामावेश करण्यात आला आहे.

कळवा रुग्णालय प्रकणावर शिंदे म्हणाले की, ठाणे येथील रुग्णालयात घडलेली रुग्णांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील काही रुग्ण हे अत्यंत क्रिटिकल स्थितीत दाखल झाले होते, काही रुग्ण खासगी रुग्णालयातूनही संदर्भित झाले होते'.

'वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने वेगवेगळ्या दिवशी सदरचे रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. या अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्याशीही बोलणे झाले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT