Mumbai News : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक 10 सप्टेंबरला तर निवडणुकीचा निकाल 13 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेना मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहे.
आदित्य ठाकरेंच सहकारी राहुल कनाल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने युवासेनेची ताकद कमी झाली आहे. कनल यांचा तरुणांमध्ये चांगला संपर्क असल्याने ही निवडणूक आदित्य ठाकरेंसाठी जड जाऊ शकते.
युवा सेना तिसऱ्या निवडणुकीला सामोरे जात आहे. ही निवडणूक हाईप करण्याची गरज नाही. सिनेटमधील आमचं काम सगळ्यांना माहिती आहे. जे जे आम्हाला मतदान करू इच्छिता ते आमच्या सोबत येतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. (Latest Marathi News)
मिड डेच्या वृत्तानुसार, मागील सिनेट निवडणुकीत शिवसेनेचे सर्व 10 उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे आम्ही एकट्याने निवडणूक लढवण्यास तयार आहोत. मतदारांवर आमची पकड आहे. त्यामुळेच ही निवडणूक युती न करता लढण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे. त्यामुळेच सध्या आम्ही एकट्याने निवडणुकीची तयारी करत आहोत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे यांची ही पहिलीच निवडणूक आहे. (Political News)
दरम्यान युवा काँग्रेस वरिष्ठाच्या निर्णयाची वाट पाहत आहे. आम्ही निवडणूक लढवण्यास तयार आहोत. पण आम्ही आमच्या राज्य हायकमांडच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असे झीशान सिद्दिकी यांनी म्हटलं.
आम्ही प्रत्येक पर्यायासाठी तयार आहोत. जर आमच्या नेत्याने आम्हाला एकट्याने निवडणूक लढवण्यास सांगितले तर आम्ही तसेही करू. तसेच त्यांनी आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याचे ठरवले तर आम्ही त्यासाठीही तयार आहोत, असंही सिद्दीकी त्यांनी म्हटलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.