Dombivli News : डोंबिवलीतील बेकायदा बांधकामांमधील घरांबाबत भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

Dombivli Home News : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे आमदार गणपत गायकवाड यानी सांगितले.
Dombivli News
Dombivli NewsSaam TV
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan News : महापालिकेच्या आरक्षित भूखंड, रस्ते, गुरुचरण जमिनीवर खोटे कागदपत्र, खोटा रेरा नंबर वापरुन घरांचे रजिस्ट्रेशन केले जात आहे. अधिकारी पैसै खाऊन बेकायदा बांधकामांचे रजिस्ट्रेशन करुन देत असल्याचा असा गाौप्यस्फोट भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. लोकांची खुलेआम फसवणूक केली जात आहे. डोंबिवलीत हा प्रकार उघडकीस आला आहे. याची तक्रार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचे आमदार गणपत गायकवाड यानी सांगितले.

कल्याण डोंबिवलीत काही दिवसापूर्वी रेरा घोटाळा उघडकीस आला आहे. कशा प्रकारे खोटे कागदपत्रांच्या आधारे रेरा प्राधिकरण, महापालिका आणि सरकारची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. हजारो लोकांना फसवण्यात आले. या प्रकरणी ६५ बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाच्या चौकशीकरिता एसआयटी नेमली आहे. हे प्रकरण ईडीपर्यंत गेले. तपासानंतर काही जणांना अटक केली गेली. (Latest Marathi News)

Dombivli News
Vasai News: हृदयद्रावक! फुटबॉल खेळता खेळता मैदानावर कोसळला... २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ; नेमकं काय घडलं?

या प्रकरणी तपास सुरु आहे. कल्याणचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आता याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. डोंबिवली गांधीनगरमधील रजिस्ट्रेशन कार्यालयात रिसेल रजिस्ट्रेशन सुरु असल्याचा प्रकार भाजप पदाधिकाऱ्यानी उघडकीस आणला आहे. २०१७ साली रिसेल रजिस्ट्रेशन बंद असताना हे रजिस्ट्रेशन सुरु आहे, असा आरोप करण्यात आला आहे. (Maharashtra News)

याबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. कशा प्रकारे महापालिकेतील भूखंड, मैदाने, रस्ते गुरुचरण जागा अनधिकृतपणे लाटून त्यावर बेकायदा बांधकामे केली जातात. त्याला खोटा रेरा नंबर , महापालिकेचे बनावट नकाशा , शिक्का तयार केला जातो. रजिस्ट्रेशन कार्यालयातील अधिकारी पैसे घेऊन रजिस्ट्रेशन करीत आहे ही अतिशय धक्कादायक बाब आहे.

Dombivli News
Indrayani River: इंद्रायणी नदीत दोन तरुण बुडाले, अंघोळीसाठी पाण्यात उतरले असता झाले बेपत्ता; शोध सुरु

डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमधील काही भागातील अनधिकृत बांधकामाचे रजिस्ट्रेशन केले जात आहे. या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार आहे. या अधिकाऱ्यांविरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे, अन्यथा निष्पाप सामान्य नागरिकांनी फसवणूक अशीच सूरु राहणार, हे कुठे तरी थांबले पाहिजे, असंही गायकवाड यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com