Indrayani River: इंद्रायणी नदीत दोन तरुण बुडाले, अंघोळीसाठी पाण्यात उतरले असता झाले बेपत्ता; शोध सुरु

Two youths drowned in Indrayani river : इंद्रायणी नदीमध्ये आंघोळीसाठी गेलेले दोन तरुण अचानक बेपत्ता झाले.
Indrayani River
Indrayani RiverSaam Tv
Published On

गोपाल मोटघरे, पिंपरी-चिंचवड

Pimpari Chinchwad Fire Brigade: पिंपरी चिंचवड शहरातील (Pimpari- Chinchwad City) मोशी परिसरातील इंद्रायणी नदीमध्ये (Indrayani River) एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शनिवारी इंद्रायणी नदीमध्ये आंघोळीसाठी गेलेले दोन तरुण अचानक बेपत्ता झाले. हे तरुण अद्याप सापडले नाही. अग्निशमन दलाकडून (Fire Brigade) या तरुणांचा शोध सुरु आहे.

Indrayani River
Case Filed Against Priyanka Gandhi: '50 टक्के कमिशन सरकार' वरून वाद, प्रियांका गांधी आणि कमलनाथ यांच्याविरोधात ४१ ठिकाणी FIR

मिळालेल्या माहितीनुसार, शक्तिमान कुमार (२० वर्षे) आणि सोनू कुमार बैठा (२० वर्षे) हे दोन तरुण शनिवारी इंद्रायणी नदीवर अंघोळीसाठी गेले होते. अंघोळीसाठी ते नदीच्या पाण्यामध्ये उतरले. पण अचानक दोघेही बेपत्ता झाले. या दोन्ही तरुणांना नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Indrayani River
Doctors Village: कल्याणमधलं अनोखं डॉक्टरांचं गाव, प्रत्येक घरात आहे एक डॉक्टर...

पिंपरी- चिंचवड शहरातील अग्निशमन दलाने शनिवारी इंद्रायणी नदी परिसरामध्ये या दोन्ही तरुणांचा शोध घेतला पण ते काही सापडले नाही. त्यानंतर रविवारी सकाळपासून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीच्या मदतीने इंद्रायणी नदी परिसरामध्ये या तरुणांचा शोध घेतला पण ते सापडले नाहीत. अखेर त्यांनी शोध मोहिम थांबवली. दरम्यान, शक्तिमान आणि सोनू हे दोन्ही तरुण बिहारचे रहिवासी आहेत. ते पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कामानिमित्त राहत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com