JUNNAR POLITICS saam tv
मुंबई/पुणे

'माझ्याशी संबंध चांगले ठेवा...' शिंदे सेनेच्या आमदाराच्या कथित कॉल रेकॉर्डिंगने जुन्नरमध्ये खळबळ

Sharad Sonawane Devaram Lande Alleged Call Recording: जुन्नरच्या राजकारणात कथित ऑडिओ क्लिपमुळे खळबळ! आमदार शरद सोनवणे आणि आदिवासी नेते देवराम लांडे यांच्यातील कथित संभाषण समोर आल्याचा दावा. १० कोटींच्या कथित व्यवहारानंतर नव्या ऑडिओ क्लिपची चर्चा.

Omkar Sonawane

पुणे: जुन्नरच्या राजकीय वर्तुळात सध्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे मोठी चर्चा रंगली आहे. जुन्नरचे शिवसेना आमदार शरद सोनवणे आणि आदिवासी नेते देवराम लांडे यांच्यातील कथित संभाषण समोर आल्याने या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. कालच देवराम लांडे यांची आदिवासींच्या जमिनी मिळवून देण्यासाठी १० कोटी रुपयांच्या व्यवहाराचा दावा केल्याची कथित ऑडिओ क्लिप समोर आली होती. या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता आमदार शरद सोनवणे आणि देवराम लांडे यांच्यातील आणखी एक कथित कॉल रेकॉर्डिंग समोर आल्याचा दावा केला जात आहे.या रकॅार्डिंगची साम टीव्ही पुष्टी करत नाही

या संभाषणात आमदार शरद सोनवणे आक्रमक भूमिका घेत असल्याचा दावा आहे. माझ्याशी संबंध चांगले ठेवा. त्या अतुल बेनके यांच्या पुढे-पुढे करायचे असेल तर करा, मात्र वाहवत जाऊ नका. मी राज्यातील शहाणा आमदार आहे," अशा शब्दांत सोनवणे यांनी लांडे यांना सुनावल्याचे कथित संभाषणातून समोर येत आहे. इतकेच नाही तर, माझ्या रस्त्याच्या कामाची चौकशी करणारे तुम्ही कोण? तुमच्या चौकशा लावू का? असा सवाल करत आमदार सोनवणे यांनी लांडे यांना सुनावल्याचा दावा आहे.

एकसुद्धा काम करून देणार नाही. मी कोणाच्या अंगावर कधी जात नाही. पण जेव्हा जातो, तेव्हा मी कोणालाही सोपा वाटत नाही, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिल्याचे या ऑडिओ क्लिपमधून ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, देवराम लांडे यांची सून नुकतीच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आली आहे. यातच अदानी यांच्या वीज प्रकल्पाला आदिवासी नेते देवराव लांडे हे विरोध करत आहे याच पार्श्वभूमीवर कथित संभाषणात आमदार सोनवणे त्यांना राजकीय संयमाचा सल्ला देताना म्हणतात,

तुम्ही आताच निवडून आला आहात. अजून तुमच्या हातात साडेचार वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे देवराम लांडे, तुम्ही संयमाने वागा." या कथित कॉल रेकॉर्डिंगमुळे जुन्नरच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका बाजूला १० कोटींच्या कथित व्यवहाराची ऑडिओ क्लिप, तर दुसऱ्या बाजूला आमदार शरद सोनवणे आणि देवराम लांडे यांच्यातील कथित संभाषण... यामुळे या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळेच राजकीय वळण मिळाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes : डायबिटीज असतानाही १०० वर्षे जगता येतं! फक्त 'ABCD' मंत्र पाळा; काय आहे हा फॉर्म्युला?

Indian Railways : मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुशखबर! वंदे भारतमध्ये मिळणार खास सरप्राईज

Hot Tea Health Risks: गरम-गरम चहा प्यायल्याने होतो कॅन्सर? नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर

25 कोटींचा प्रस्ताव, 5 कोटींची मागणी अन् ऑडिओ क्लिप! शिरसाटांचा संजय राऊतांना इशारा

Neral Railway Station: ४ सरकते जिने, ५ लिफ्ट अन् ४३७ प्रवाशांसाठी बसण्याची सोय, नेरळ रेल्वे स्थानकाला मिळालं सुवर्ण मानांकन

SCROLL FOR NEXT