ऐन दुष्काळात सोलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज! १,३५० कोटींचा निधी मंजूर, पाणीप्रश्न सुटणार?

Solapur Rs 1350 Crore Water Supply Project: सोलापूरकरांसाठी मोठा दिलासा! १ हजार ३५० कोटींच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता. दोन नवीन जलशुद्धीकरण केंद्रे, ३० जलकुंभ आणि १२२७ किमी जलवाहिन्यांचे जाळे उभारणार.
Solapur water supply project
Solapur water supply projectsaam tv
Published On: 

सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणाऱ्या 1 हजार 350 कोटी रुपये खर्चाच्या सुधारित सोलापूर पाणीपुरवठा योजनेला आज महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र नागरी पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर योजना (MUWREP) अंतर्गत गठित राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या (State Steering Committee – SSC) बैठकीत मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चेनंतर सदर योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यास मंजुरी देण्यात आली. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

Solapur water supply project
जळगावच्या कुटुंबासोबत गुजरातमध्ये भयंकर प्रकार! सहा जणांना कालव्यात फेकलं, तिघांचा मृत्यू

या निर्णयामुळे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित १२० एमएलडी आणि ३० एमएलडी क्षमतेची अशी दोन नवीन जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामुळे एकूण १५० एमएलडी क्षमतेची नवीन जलशुद्धीकरण सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर शहरातील पाणी साठवण आणि वितरण व्यवस्था बळकट करण्यासाठी ३० नवीन उंच जलकुंभ (ESR) आणि १० नवीन एमबीआर (MBR) टाक्यांची उभारणी करण्यात येणार असल्याचे मंत्री गोरे यांनी सांगितले.

Solapur water supply project
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना नव्याने ई-केवायसी करावी लागणार? सरकारने दिली महत्वाची अपडेट

ऐन दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवी संजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 1 हजार 350 कोटी रुपयांच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेला मुख्य सचिवांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत जागतिक बँकेच्या सहाय्याने शहरात दोन नवीन जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात येणार आहेत. तसेच, शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी एकूण 30 जलकुंभ उभारले जाणार असून, तब्बल 1 हजार 227 किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्यांचे जाळे तयार करण्यात येणार आहे.

Solapur water supply project
Government Job: नाशिक महापालिकेत २०४ पदांसाठी मेगाभरती, दरमहा मिळवा १.१० लाख पगार; कुठे अन् कसा करायचा अर्ज?

या योजनेत सोलापूर शहरातील 2 लाख 38 हजार नळजोडण्यांना पाणी मीटर बसवण्याचाही समावेश आहे. त्यामुळे पाण्याचा वापर मोजणे आणि पाणीपुरवठा व्यवस्थापन अधिक प्रभावी करणे शक्य होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.