ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाला (truck driver strike) माझं पूर्णपणे समर्थन आहे असे आमदार जितेंद्र आव्हाड (mla jitendra awhad) यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. ते म्हणाले कायदा हा मनाप्रमाणे बनवायचा नसताे. समाजाला पटेल की नाही त्यामुळे समाजाला त्रास हाेणार नाही याची दखल घ्यायची असते असेही आव्हाड यांनी नमूद केले. (Maharashtra News)
नव्या हिट अँड रन कायद्याच्या (New Hit And Run Law) विराेधात आजही (मंगळवार) राज्यभरात ट्रक चालकांचा संप (truck driver strike) सुरु आहे. यामुळे राज्यातील इंधन पूरवठा, भाजी पूरवठा आदींवर माेठा परिणाम झाला आहे. या आंदाेलनास आमदार आव्हाड यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले जर दरवेळी नागरिकांचा गाडी खाली येऊन अपघात होत असेल तर फक्त ट्रक चालकाचीच चुकी असते का? असं असेल तर तुमचे नियम असे कडक करा की रस्त्याच्या अधून मधून रस्ता ओलांडताना जर कोणी दिसला तर त्याच्या घरच्यांना दहा लाख रुपये दंड करा.
हा कायदा फक्त ट्रक चालकांना नाही छोट्या वाहन चालकांना देखील लागू आहे. या कायद्याने चांगल्या चांगल्या घरातील लोक जेलमध्ये जाणार आहेत. आतापर्यंत जेलची मर्यादा दोन वर्षे होती ती दहा वर्ष केली गेली आहे. त्यांना जामीन घेण्यासाठी देखील एक महिना लागेल अशी भीती आमदार आव्हाड यांनी व्यक्त केली.
कुठलाही कायदा बनवताना त्याचा संबंध ज्याच्याशी होतो त्या संघटनांशी चर्चा करूनच कायदा बनवायचा असतो. कायदा आपल्या मनाप्रमाणे बनवायचा नसतो. सध्या ह्यांना पोलीस राज करायचा आहे, पोलिसी राज सुरू झालेल आहे ते पॉलिसी राज अंतिम टप्प्यात कुठे जातं ते पुढे कळेल असेही आमदार आव्हाड यांनी नमूद केले.
ते म्हणाले भारतात किसान आंदोलन सुरू झालं तेव्हा तुम्हाला वाटलं होतं एक दोन दिवसात ते मागे घेतील, ते काय करतील पण माणसं जेव्हा हिंसेला भेटतात तेव्हा ते मरायलाही घाबरत नाही, ट्रक चालक आता घाबरले आहेत पंधरा लाख आणायचे कुठून.
पेट्रोल डिझेल सोडून द्या, उद्या भाजीपाला दूध जीवनाश्यक वस्तू देखील बंद होणार आहेत. गावोगावी जाणारे पाण्याचे टँकर सुद्धा बंद होतील. हे फक्त ठाण्यापूरते मर्यादित नाही की वागळे स्टेट मध्ये घडलं आणि दत्त मंदिरात बसून विषय सोडवला हे भारतभर सुरू आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हे ट्रक ड्रायव्हर कुठलाही श्रीमंत घरातले नाही ते कुठेही उच्चभ्रू सोसायटीत राहत नाहीत. ते रस्त्यावर कुठेही राहतात. बायको पोरांपासून लांब राहतात. सरकारला यांना गरीब माणसांवर प्रेम नाही आदर नाही सर्व मानवी मूल्यांची हत्या करून या देशाला जर तुम्ही पोलिसी राज्य करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे असेही आव्हाडांनी नमूद केले.
या संपाला आणि आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाचं मी समर्थन करत नाही पण या कायदा विरोधात लोकांनी उभं राहिले पाहिजे. ट्रक ड्रायव्हर उभे राहिले तर भारत बंद करू शकतात. उद्यापासून तुम्हाला पेट्रोल, खाद्यपदार्थ, भाज्या आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर बंद होईल.
माझं दोन-तीन संघटनांशी बोलणं झाला आहे. मी माझ्या मतावर ठाम असतो मी कोणाच्या बोलण्यावर ऐकत नाही मी माझ्या विचारांवर चालतो असेही आव्हाडांनी एका प्रश्नावर उत्तर दिले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.