jayakwadi dam water issue in mumbai high court saam tv
मुंबई/पुणे

Jayakwadi Dam : जायकवाडीला पाणी देऊ नका... उच्च न्यायालयात याचिका दाखल, ५ डिसेंबरला सुनावणी

जायकवाडीला पाणी देऊ नका अशी मागणी नगरसह नाशिक जिल्ह्यातील शेतक-यांनी देखील केली आहे.

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Nagar News : जायकवाडी धरणात नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला मुंबईला उच्च न्यायालयात (petition on jayakwadi dam water in mumbai high court) आव्हान देण्यात आले आहे. त्यानूसार येत्या 20 नोव्हेंबरला राज्य शासनास म्हणणे मांडण्याचा आदेश करण्यात आला आहे. दरम्यान राज्य शासनाने म्हणणे मांडल्यानंतर पुढील सुनावणी 5 डिसेंबरला हाेणार आहे. ताेपर्यंत धरणातून पाणी सोडता येणार नाही असे म्हटले जात आहे. (Maharashtra News)

जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. यादोन्ही जिल्ह्यातील धरणांमधून ८.६० टीएमसी इतके पाणी जायकवाडीली साेडले जाणार आहे. या निर्णयाच्या विराेधात नाशिक आणि नगर जिल्ह्यातील शेतक-यांसह लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला आहे. त्यामुळे अद्याप जायकवाडीसाठी पाणी साेडलेले गेले नाही.

यामुळे मराठवाड्यातील नेते आक्रमक झाले आहेत. जायकवाडीसाठी पाणी मिळावे यासाठी आमदार राजेश टाेपे यांनी न्यायालयात धाव घेणार असल्याचे नुकतेच नमूद केले. शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खाेतकर यांनी देखील जायकवाडीसाठी पाणी मिळावे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान कोपरगाव येथील काळे कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा फेर निर्णय येई पर्यंत पाणी सोडू नये अशी मागणी करत याचिका कालबाह्य झालेल्या मेंढेगीरी समीतीच्या अहवालाच्या आधारे पाणी न सोडण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याबाबत 20 नोव्हेंबरला राज्य शासनास आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ म्हणणे मांडण्याचा आदेश करण्यात आला आहे. शासनाने म्हणणे मांडल्यानंतर 5 डिसेंबरला पुढची सुनावणी हाेणार आहे. ताेपर्यंत धरणातून पाणी सोडता येणार नाही. त्यामुळे नगर आणि नाशिकमधील नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT