Iqbal Singh Chahal saam tv
मुंबई/पुणे

Iqbal Singh Chahal : मोठी बातमी! इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती

Vishal Gangurde

Iqbal Singh Chahal Latest News:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी आणि त्यानंतर प्रशाकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरु होत्या. काही दिवसांपूर्वी इक्बाल सिंह चहल यांना मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवलं. त्यानंतर इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

लोकसभा निवडणुकी आधी इक्बाल चहल यांना १८ मार्चला मुंबईच्या आयुक्तपदावरून हटवलं होतं. चहल हे महाराष्ट्र कॅडरचे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहे. मागील अनेक वर्षात महाराष्ट्र सरकारच्या अनेक पदांवर काम केलं आहे.

चहल यांनी चार वर्ष ठाणे जिल्हाधिकारी पदावर काम केलं आहे. संभाजीनगरमध्येही त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. यानंतर आता मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोरोना काळात माजी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महत्वाची भूमिका निभावली.

दुसरीकडे माजी अतिरिक्त आयुक्त मुंबई महापालिका (प्रकल्प) पी वेलरासू यांची नियुक्ती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या सचिव पदावर करण्यात आली आहे.

कोण आहेत इक्बाल सिंह चहल ?

इक्बालसिंह चहल यांनी गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिका आयुक्तपदाचं काम सांभाळलं. चहल हे १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावर काम करण्यााआधी त्यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवपदावर काम केलं. त्यांचा जन्म 20 जानेवारी 1966 झाला.

त्यांचं राजस्थानमधील जोधपूरमध्ये शिक्षण झालं. त्यांनी बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेत ९६ टक्के गुणांसह राष्ट्रीय गुणवत्तेत पहिलं स्थान पटकावलं होतं. तसेच त्यांनी इलेक्‍ट्रॉनिक्‍स अॅण्‍ड इलेक्‍ट्रीकल कम्‍युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक ही पदवी संपादित केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT