PM Modi Bhutan Visit: पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान, 'Order of the Druk Gyalpo' ने केलं सन्मानित

PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानमधील सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. भूतानमध्ये हा सन्मान मिळवणारे ते पहिले व्यक्ती आहेत.
PM Modi Bhutan Visit
PM Modi Bhutan VisitSaam Tv
Published On

PM Modi Bhutan Visit:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानमधील सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. भूतानमध्ये हा सन्मान मिळवणारे ते पहिले व्यक्ती आहेत. ज्यांना दुसऱ्या देशाचे प्रमुख म्हणून हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे.

भूतानमध्ये Order of the Druk Gyalpo आतापर्यंत फक्त भूतानी व्यक्तींनाच देण्यात आला आहे. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांनी त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Modi Bhutan Visit
Satara Lok Sabha: उदयनराजे दिल्लीत, मात्र अमित शाह यांची भेट झालीच नाही; साताऱ्यात भाजप कोणाला देणार उमेदवारी?

आतापर्यंत हा पुरस्कार फक्त चारच मान्यवरांना देण्यात आला आहे. याआधी 2008 मध्ये हा पुरस्कार रॉयल क्वीन आशी केसांग वांगचुक यांना देण्यात आला होता. हा सन्मान मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या राजाचे आभार मानले. तसेच हा 140 कोटी भारतीयांचा सन्मान असल्याचे ते म्हणाले. भूतानमध्ये हा जीवनगौरव पुरस्कार मानला जातो.  (Latest Marathi News)

दरम्यान, नेबरहुड फर्स्ट धोरणांतर्गत भूतानशी भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान मोदी हे दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर आहेत. भूतानमध्ये पोहोल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

PM Modi Bhutan Visit
BJP Candidate List: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची चौथी यादी जाहीर, प्रसिद्ध अभिनेत्रीला उमेदवारी

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भूतानचे राजे महामहीम जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे चौथे राजे महामहीम जिग्मे सिंग्ये वांगचुक यांची भेट घेतली. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोबगे यांच्याशी चर्चाही करणार आहेत. तसेच भारत सरकारच्या सहकार्याने थिम्पू येथे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक ग्यालत्सुएन जेत्सुन पेमा माता बालक रुग्णालयाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com