Mumbai Mega Block News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block News: मेगाब्लॉकचा रेल्वे प्रवाशांना फटका; मुंबई-पुणे दरम्यान 29 एक्सप्रेस रद्द, लोकल प्रवाशांचेही हाल होणार

Mega Block News: शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे डेक्कन क्वीन आणि प्रगती एक्सप्रेससह सिंहगड, इंटरसिटी पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाड्या काही कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईतील शहरातील शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. या कामामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानच्या अनेक रेल्वे गाड्याच्या फेऱ्या रद्द् करण्यात आलेल्या आहेत. यामुळे पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत.

मुंबईतील शिवाजी महाराज टर्मिनलच्या प्लॅटफॉर्म(platforms) आणि रुळाच्या कामाच्या विस्तारीकरणासाठी दोन दिवस पुणे मुंबई रेल्वे गाड्या बंद राहणार आहेत. डेक्कन क्वीनसह प्रगती एक्सप्रेस आणि सिंहगड , इंटरसिटी पुणे आणि अनेक गाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. यात तब्बल २९ रेल्वे गाड्या रद्द् करण्याचा रेल्वे प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आलेला आहे.

कोणत्या रेल्वे रद्द

दररोज असंख्य व्यक्ती मुंबई- पुणे प्रवास करत असतात. त्यामुळे दररोज पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस ३१ मे पासून ते २ जूनपर्यंत रद्द करण्यात आली असून पुणे- मुंबई(Mumbai)-पुणे प्रगती एक्सप्रेस २८ ते २ जून या कालावधीत रद्द करण्यात आलीय. डेक्कन क्वीन ,कुर्ला-मडगाव- कुर्ला या रेल्वे गाड्या १ ते २ जूनच्या कालावधीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

येत्या महिन्याच्या १ जूनला डेक्कन क्वीनला तब्बल ९४ वर्षे पूर्ण होणार आहेत. दरवर्षी या गाडीने दररोजचा प्रवास करणारे प्रवासी केक कापून या डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करत असतात. मात्र या वर्षी वाढदिवसा वेळी डेक्कन क्वीनचा प्रवास रद्द करण्यात आलेला आहे.

लोकल सेवेला फटका

मध्य रेल्वे मार्गावरही जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील ठाणे आणि सीएसएमटी या स्थानकांवर ९९ तासांता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ठाणे रेल्वे स्थानकावर ६३ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असून सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

या मेगाब्लॉक कालावधीमध्ये ९३० लोकल फेऱ्या आणि ७२ मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे स्थानकातील गर्दी आणि प्रवाशांची असुविधा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम किंवा शक्य असेल तर सुट्टी द्या, असे आवाहन मध्य रेल्वेने सर्व सरकारी आणि (Private) खासगी ऑफिसला केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'लोकशाही टिकवण्यासाठी एक व्हावं लागेल'; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

धुळ्यात बनावट नोटांसह एक जेरबंद; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ

Til Ladoo: हिवाळ्यात खा तिळाचे लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

IMD Winter Update : नोव्हेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडणार का? IMD ने केला खुलासा , जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Live News Update : ऊस दराच्या मुद्द्यावरून कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT