काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्या प्रवेशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
शिवसेना फुटीनंतर दक्षिण मुंबई जागेवर भाजप दावा सांगण्यास सुरुवात केली होती. ठाकरे गटाचे अरविंद सावंत येथे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडे ताकदीचा उमेदवार नसल्याचा फायदा घेत भाजपने येथून आपला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु केली होती.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिलिंद देवरा यांना दक्षिण मुंबईमधून उमेदवारीसाठी शब्द दिल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यासाठी भाजपला या जागेवर पाणी सोडावं लागण्याची दाट शक्यता आहे. अशीरितीने एकनाथ शिंदे यांच्या शिंदे यांनी शिवसेनेचा मतदारसंघ आपल्याकडे शाबूत ठेवला आहे. तर भाजपच्या दबावतंत्राला देखील रोखठोक उत्तर दिलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईतून दोनदा खासदार झाले आहेत, तर त्यांचे वडील मुरली देवरा यांनी चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मिलिंद देवरा दक्षिण मुंबईच्या जागेवरून 2004 आणि 2009 मध्ये सलग दोनदा विजयी झाले, पण 2014 मध्ये मोदी लाटेनंतर ते सलग दोनदा निवडणुकीत पराभूत झाले. (Latest Marathi News)
2014 आणि 2019 मध्ये भाजपसोबत असताना जो फायदा झाला, तो आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला मिळू शकणार नाही, हे उघड आहे. दरम्यान दोन वेळा निवडणूक हरल्यानंतरही मिलिंद देवरा यांच्या पाठिंब्यामध्ये कोणतीही घट झालेली नाही. दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे बहुतांश कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मिलिंद देवरा यांच्यासोबत असून त्यांनी शनिवारी शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला आहे. दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळाल्यास त्याचा फायदा मिलिंद देवरा यांना नक्कीच मिळू शकतो.
मिलिंद देवरा यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवर उत्तर प्रभुत्व आहे. त्यामुळे मिलिंद देवरा हे शिंदे गटाचा दिल्लीतील आवाज देखील बनू शकतात. याशिवाय मिलिंद देवरा यांच्या दिल्ली कनेक्शनचा फायदा शिंदे यांच्या शिवसेनेला होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.