नवी दिल्ली : ग्रेटर नोएडामध्ये यमुना महामार्गावर रविवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात कृपालू महाराजांची मोठी मुलगी विशाखा त्रिपाठी यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दोन मुली कृष्णा त्रिपाठी आणि श्यामा त्रिपाठी यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दनकौर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तिन्ही बहिणी सिंगापूरला जाण्यासाठी दिल्ली विमानतळाच्या दिशेने निघाल्या होत्या.
यमुना महामार्गावर ८ किलोमीटर अंतरावरील बोर्डाजवळ कृपालू महाराजांच्या मुलींच्या कारने दुसऱ्या कारला धडक दिली. या संपूर्ण अपघातात ८ जण जखमी झाले. या घटनेनंतर अपघातामधील जखमींना तातडीने कैलाश रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात पाठवण्यात आलं. यावेळी रुग्णालयात विशाखा त्रिपाठी यांचा मृत्यू झाला. तर श्यामा त्रिपाठी आणि कृष्णा त्रिपाठी या दोन्ही बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोन्ही जखमी बहिणींवर वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.
विशाखा त्रिपाठी या कृपालू परिषदेच्या अध्यक्षा होत्या. त्या ट्रस्टच्या शिक्षण संस्था आणि रुग्णालयाचं काम पाहायच्या. भक्त त्यांना प्रेमाने दीदी म्हणायचे. त्यांचा जन्म १९४९ साली प्रतापगडाच्या कुंडाजवळी लीलापूरमध्ये झाला होता. त्या व्यावसायिक चित्रकार होत्या. त्या कला विषयात पदव्युत्तर होत्या.
त्यांची दुसरी मुलगी श्यामा त्रिपाठी श्यामा श्याम धाम, वृंदावनच्या अध्यक्षा आहेत. लोक त्यांना प्रेमाने मंझली दीदी म्हणून हाक मारायचे. त्यांचा जन्म १९५४ साली प्रतागडच्या मनगड येथे झाला होता. त्यांनी संस्कृत भाषेत पीएचडी मिळवली होती. त्यांनी दिवंगत कृपालू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचा अभ्यास केला होता. तिसरी मुलगी रंगीली महल, बरसाना संस्थेच्या अध्यक्षा होत्या. भक्त त्यांना प्रेमाने छोटी दीदी म्हणायचे. त्यांचा जन्म १९५७ सालचा आहे. त्यांनीही संस्कृत भाषेत पीएचडी मिळवली आहे.
जगद्गुरु कृपालू महाराज प्रतापगड जिल्ह्यातील मनगढनमध्ये भक्तिधाम आणि वृदांवनमधील प्रेम मंदिराचे संस्थापक होते. त्यांच्या निधनानंतर दोन्ही मंदिराचं कामकाज तिन्ही मुली सांभाळतात. आज रविवारी सकाळी ८ वाजता ग्रेटर नोएडा जिल्ह्यातील आग्रा येथून नोएडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातानंतर कृपालू महाराज ट्रस्टने शोक संदेश जाहीर केला. यामध्ये म्हटलं की, 'अत्यंत दु:ख होत आहे की, भक्तिधामचे अध्यक्ष डॉ. विशाखा त्रिपाठी यांचा रस्ते अपघातात निधन झालं आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार वृंदावनमध्ये केले जाणार आहेत'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.