Explainer: मिलिंद देवरा शिंदे गटातच का गेले? भाजपमध्ये का नाही? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

Milind Deora join Shinde group: मिलिंद देवरा यांनी रविवारी मोठा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसचा हात सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Why did Milind Deora join Shinde group? Why not in BJP? Know the inside story
Why did Milind Deora join Shinde group? Why not in BJP? Know the inside storySaam Tv
Published On

Why did Milind Deora join Shinde group? Why not in BJP? Know the inside story :

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मिलिंद देवरा यांनी रविवारी मोठा निर्णय घेतला. त्यांनी काँग्रेसचा हात सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. अशातच राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार असताना ते शिंदे गटातच का सामील झाले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिलिंद देवरा यांची यामागे नेमकी रणनीती काय आहे, हेच जाणून घेऊ. मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून आयापर्यंत निवडणूक लढवली आहे. 2004 आणि 2009 मध्ये ते येथून खासदार म्हणून निवडून आले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Why did Milind Deora join Shinde group? Why not in BJP? Know the inside story
Maratha Reservation: एकच मिशन फक्त मराठा आरक्षण, मुंबईकडे जाताना मनोज जरांगेंचा मुक्काम कुठे-कुठे असणार?

याआधी त्यांचे वडील मुरली देवराही याच मतदारसंघातून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी ही जागा ठाकरे गट जिंकू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सध्या इथून ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार आहेत. त्यांनी 2019 मध्ये मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. (Latest Marathi News)

यावेळीही ठाकरे गट 23 जागांवर दावा करत असून ते दक्षिण मुंबईच्या जागेवर ठाम आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 2019 मध्ये ज्या जागा जिंकल्या होत्या त्या जागांवर ठाकरे गट पुन्हा आपले उमेदवार उतरवणार असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसही ठाकरे गटासाठी ही जागा सोडू शकतो, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Why did Milind Deora join Shinde group? Why not in BJP? Know the inside story
Aditya Thackeray: '५० खोके, ५० लोक; वऱ्हाड निघालं दाओसला...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री शिंदेवर टीकास्त्र

यातच मिलिंद देवरा यांनी आपला मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएच्या जागावाटपात दक्षिण मुंबईच्या जागेवर एकनाथ शिंदे गट दावा करत आहे. ही जागा त्यांना भाजपकडून मिळू शकते, असे बोलले जात आहे. मिलिंद देवरा यांना इथं मोठ्या प्रमाणात लोकांचं समर्थनही आहे.

अशातच मिलिंद देवरा यांना येथून मैदानात उतरवून शिंदे गटाला फायदा होऊ शकतो, असं सूत्रांचा म्हणणं आहे. याच समीकरणामुळे मिलिंद देवरा यांनी आपल्या नव्या राजकीय खेळीसाठी एकनाथ शिंदे गटाची निवड केल्याचे राजकारणातील जाणकारांचे म्हणणं आहे. सूत्रांनी असेही म्हटलं आहे की, लोकसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधी काँग्रेसचे अनेक नेते पक्षाला रामराम ठोकू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com