
मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांचा सत्कार केला. अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला.
ठराव क्रमांक १-
निवडणुकीत मतदारांनी यश दिल्याबद्दल मतदारांचे आभाराचा ठराव मांडला.
ठराव क्रमांक २ -
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडण्यात आला.
महाराष्ट्रातील विजयाबद्दल अभिनंदन या ठरावाला शंभुराजे देसाई यांनी अनुमोदन दिले
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रसिनो फार्मा नावाच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. कंपनीत स्फोट होत असल्यामुळे आजूबाजूच्या ३ कंपन्यांनाही आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कंपनीमध्ये कामगार अडकले असण्याचीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.
विधानसभेतील भाजपच्या संख्याबळात वाढ झाली आहे.
चंदगढचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला.
भाजपला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे शिवाजी पाटील यांच्याकडून जाहीर
अपक्ष आमदाराच्या पाठिंब्याने भाजपचे एकूण संख्याबळ 133 वर पोहोचली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह बाबत २६ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणारी सुनावणी महत्वाची ठरणार आहे. मागच्या सुनावणीवेळी कोर्टाने अजित पवार यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा सल्ला दिला होता. सोबतच जाहिरात देऊन पक्ष आणि घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशा आशयाचा डिस्क्लेमर लिहिण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळं सुनावणीत काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
पंधराव्या विधानसभेची अधिसूचना जारी केलं आहे.26 नोव्हेंबरनंतर नवीन विधानसभा अस्तित्वात येणार आहे. त्याबाबत राजपत्र काढण्यात आले.
नव्या सरकारमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मागच्या मंत्रिमंडळातील अनेक चेहऱ्यांना वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी १० वाजता महत्वाची बैठक होणार आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनात बैठक होणार. हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे घेऊन आक्रमक व्हायचं आणि विरोधी पक्षाची काय रणनीती असावी यावर होणार चर्चा
भारत निवडणूक आयोगाचे उप मुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची रविवारी राजभवन मुंबई येथे भेट घेतली. त्यांना राज्य विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना - निवडून आलेल्या सदस्यांची यादी - व राजपत्राची प्रत सादर केली.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेतली.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची दिली माहिती
नव्या विधानसभेच्या सदस्यांची माहितीही राजभवनात सादर
शरद पवार कराड विमानतळावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात पवारांची पत्रकार परिषद होणार आहे. निकालावर काय बोलणार शरद पवार?
बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणाऱ्या अमोल खताळ यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पाठवले विमान...
नाशिकच्या ओझर विमानतळावरून काही वेळात अमोल खताळ होणार मुंबईकडे रवाना...
थोड्याच वेळात सुजय विखे आणि अमोल खताळ होणार मुंबईकडे होणार रवाना...
संगमनेरात सुजय विखे वाढदिवस साजरा साजरा केल्यानंतर दोघेही होणार मुंबईकडे रवाना...
अमोल खताळ यांच्या विजयात सुजय विखे यांचा मोठा वाटा...
धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल श्री फडणवीस यांचं सत्कार करून अभिनंदन केले.
मात्र, फडणवीस यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील युतीच्या महाविजयाबद्दल 'माझ्या घरी आलात तर माझा नियम चालणार, यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...' असे म्हणत आधी धनंजय मुंडे यांचा सत्कार केला.
महायुतीच्या बीड जिल्ह्यातील परळीसह महाविजयाबद्दल अभिनंदन केले व पाठीवर कौतुकाची थाप मारली.
बविआसह ठाकरेंचा बालेकिल्ला उध्वस्त करण्यात रविंद्र चव्हाण व अनिकेत पटवर्धनांची मोठी भूमिका
चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांकडे महायुती समन्वयक पदाची होती जबाबदारी
अचूक समन्वयामुळेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, भिवंडी जिल्ह्यात महायुतीने मारली मुसंडी
फडणवीस यांनीही महायुती समन्वयक म्हणून अनिकेत पटवर्धनांचे केले अभिनंदन
कोकणात ३९ पैकी ३६ जागांवर महायुतीचा एकहाती विजय
शिवसेना उबाठाचे पाच आमदार आमच्या संपर्कात दोन-तीन सोडता सर्व आमदार आमच्याकडेच येतील. रात्रीपासून ते आमच्या संपर्कात आहेत.
पुण्यातील वडगाव शेरी चे सुनील टिंगरे यांनी आज घेतली अजित पवारांची भेट
अजित पवारांकडून पराभूत झालेल्या उमेदवारांना दिलासा
सत्ता आपली आली आहे, कामं करत राहा, अजित पवारांचा पराभूत झालेल्या उमेदवारांना दिलासा
पराभूत झालेल्या आमदारांपैकी अनेकांनी आज देवगिरी वर घेतली अजित पवारांची भेट
राज्यात महायुतीचे सरकार आल्याने सर्व विकासकाची कामे करत राहण्याच्या अजित पवार यांनी दिल्या सूचना
महायुतीच्या मंत्रिपदाचा उद्याच शपथविधी होण्याची शक्यता
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची शपथ पार पडणार
राजभवनाला शपथविधी होण्याची दाट शक्यता
पुणे जिल्ह्यातील कुठल्या आमदाराच्या गळ्यात पडणार पहिल्यांदा मंत्रिपदाची माळ?
राहुल कुल, माधुरी मिसाळ, सुनील शेळके, महेश लांडगे यांच्या नावाची चर्चा
पुणे जिल्ह्यातून अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांना पुन्हा एकदा तेच खाते मिळण्याची शक्यता
राज्यमंत्रीपदासाठी कुल, मिसाळ, शेळके आणि लांडगे यांच्या नावाची जोरदार चर्चा
खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र पाठक हॉटेल ताज ग्रँडमध्ये दाखल
संजय राऊत यांच्यावरती केली टीका
त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असेल
चांगल्या दिवशी त्यांचं नाव कुठे घेता
तर बाळासाहेब थोरात यांच्या वरही त्यांची टीका
अनेकांना मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पडलेले होते ते स्वप्न आमच्या उमेदवारांनी भंग केले
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील कोल्हापुरातून मुंबईच्या दिशेने रवाना
माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास जयंत पाटील यांनी केली टाळाटाळ
कुठल्याही विषयावर आपण बोलणार नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळलं
कोल्हापूर विमानतळावरून जयंत पाटील मुंबईच्या दिशेने रवाना
महायुतीच्या 6 रिक्त नेत्यांची विधान परिषदेवर लागणार वर्णी
विधानसभेत डावललेल्या नाराजांना मिळणार विधान परिषदेवर संधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परिषदेतील भाजपच्या 4 आमदारांची विधानसभेवर वर्णी
सुनील कांबळे यांना मिळणार राज्याचे सामाजिक न्याय खातं?
मंत्रिपद नाही किंवा अण्णासाहेब महामंडळ मिळावे अशी कांबळेंच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा
सुनील कांबळे हे पुणे कँटोन्मेंट चे आमदार
सुनील कांबळे यांचे बंधू दिलीप कांबळे सुद्धा होते राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री
कांबळे यांचा कॅन्टोन्मेंट मधून सलग दुसऱ्यांदा विजय
बच्चू कडूंचं ईव्हीएम विरोधातील तूर्तास आंदोलन मागे
बच्चू कडू ईव्हीएम विरोधात 26 नोव्हेंबरला काढणार होते लॉंग मार्च
चांदुर बाजार ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत होते लाँग मार्च नियोजन
बच्चू कडू यांची EVM हटाव मोहीम, तूर्तास स्थगित
भाजपाने EVM मॅनेज करून निवडणूक जिंकून जिंकल्याचा बच्चू कडू यांचा होता आरोप
पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात लागले देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर
महायुतीच्या राज्यातील विजयानंतर पुण्यात फडणवीस यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर झळकले
पुण्यातील आजी-माजी नगरसेवकांकडून फडणवीसांची बॅनर बाजी
पुण्यातील बाणेर बालेवाडी परिसरात लावण्यात आले पोस्टर्स
शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुंबईत यायला सुरूवात
मुंबईच्या वांद्रे येथील ताज अँड लॅड्समध्ये आतापर्यंत २९ आमदार उपस्थित असल्याची सूत्रांची माहिती
हाॅटेलमध्येच सर्व आमदारांच्या उपस्थितीत गटनेता निवडीची बैठक पार पडणार
उपस्थित आमदारांना एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन
राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार
निवडणूक आयोगाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती राज्यपालांना आयोगाकडून कळवली जाणार
सोबतच, निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना सादर केली जाणार
त्यानंतर राज्यपालांकडून १५ वी विधानसभा अस्तित्वात आल्याचं नोटिफिकेशन काढत सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरु करणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जाणार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षश्रेष्ठींची भेट घेणार
धक्कादायक निर्णयानंतर नाना पटोले यांची दिल्लीवारी
वरिष्ठांशी चर्चा करून आगामी रणनीती ठरवणार
सुत्रांची माहिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाना लवकरच महायुती सामोरे जाणार
ओबीसी बाबत कोर्टाचा निर्णय झाल्यावर निवडणुका घेतल्या जाणार
सूत्रांच्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर महायुती राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास
त्यामुळे राज्यात लवकरच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या एतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत सकारात्मक भूमिका आहे.
अखिल भारतीय संत समिती व साधू महंतांचा शिवसेना व महायुतीला जाहीर पाठींबा
प्रत्येक मंदिरातून मठातून साधू संत घरा घरापर्यंत आपली वारी, कीर्तने आपले सण, मंदिरे व जमिनी सुरक्षित ठेवायच्या असतील तर १०० % मतदान करा असे आवाहन महाराष्ट्रभर करत आहेत.
आज मुंबईमध्ये घेणार सकल साधू पत्रकार परिषद शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांची माहिती..
देवगिरी बंगल्यावर नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार सोहळा
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुंबईत अभिनंदनाचा सोहळा
राष्ट्रवादीच्या सत्कार सोहळ्यसाठी देवगिरीवर तयारीची लगबग
गुलाबी रंगाचा मंडप, फुलांचे गुच्छ आणि कार्यकर्त्यांच्या गर्दी
बेलापूर विधानसभेत ट्रम्पेट चिन्ह आणि नाम सामर्थ्य असलेल्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांना फटका.
महाविकास आघाडीचे संदीप नाईक यांचा केवळ 377 मतांनी भाजपा महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी पराभव केलाय.
मात्र याच ठिकाणी प्रफुल्ल म्हात्रे या अपक्ष उमेदवाराला ट्रम्पेट चिन्हामुळे 2860 मते मिळाली.
तर संदीप नाईक नावाच्या एका अपक्ष उमेदवाराला 513 मते मिळाली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.