IPL Mega Auction 2025 Live News: राजस्थानने संधी साधली! इंग्लंडच्या सर्वात वेगवान गोलंदाजाला १२.५० कोटीत घेतलं संघात

IPL Mega Auction 2025 Day 1 Live Updates : आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये सुरु आहे. या लिलावात ५७७ खेळाडूंवर बोली लागणार आहे.
ipl live
ipl live saam tv
Published On

पंजाबचा स्टार गोलंदाज हैदराबादच्या ताफ्यात

पंजाब किंग्ज संघाचा फिरकीपटू राहुल चाहर हैदराबादच्या ताफ्यात दाखल झाला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज टी नटराजन दिल्लीच्या ताफ्यात

दिल्ली कॅपिटल्सने टी नटराजनला १०.७५ कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

राजस्थानने संधी साधली! इंग्लंडच्या सर्वात वेगवान गोलंदाजाला १२.५० कोटीत घेतलं संघात

राजस्थान रॉयल्सने जोफ्रा आर्चरला १२.५० कोटीत संघात घेतलं आहे.

आवेश खान लखनऊच्या ताफ्यात

आवेश खानला संघात घेण्यासाठी लखनऊने ९.७५ कोटी रुपये मोजले आहेत.

एनरिक नॉर्खिया केकेआरच्या ताफ्यात दाखल

कोलकाता नाईट रायडर्सने एनरिक नॉर्खिया ६.५० कोटी मोजत संघात घेतलं आहे.

प्रसिद्ध कृष्णा  गुजरात टायटन्सच्या ताफ्यात

गुजरात टायटन्सने प्रसिद्ध कृष्णाला ९.५० कोटी मोजत संघात स्थान दिलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा सर्वात खतरनाक गोलंदाज RCB च्या ताफ्यात 

१२.५० कोटी रूपये देऊन आरसीबीने जोश हेझलवूडला आपल्या संघात घेतलं.

मुंबईचा विश्वासू खेळाडू हैदराबादच्या ताफ्यात

इशान किशनला ११.२५ कोटींची बोली लावत हैदराबादने आपल्या संघात स्थान दिलं आहे.

दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज केकेआरच्या ताफ्यात

क्विंटन डी कॉकवर लागली ३.६० कोटींची बोली

RCB चा शिलेदार पंजाबच्या ताफ्यात! मॅक्सवेलवर लागली अवघ्या इतक्या कोटींची बोली

ग्लेन मॅक्सवेलवर अवघ्या ४.२० कोटींची बोली लागली आहे.

आणखी एक स्टार खेळाडू पंजाबच्या ताफ्यात

मार्कस स्टोइनिसवर लागली ११ कोटींची बोली

अय्यर केकेआरच्या ताफ्यात! मिळाली स्टार्क इतकीच रक्कम! वेंकटेश अय्यरवर २३.७५ कोटींची बोली लावण्यात आली आहे

अश्विन अण्णा इज बॅक! CSK ने इतके कोटी मोजत घेतलं ताफ्यात

अश्विन अण्णा इज बॅक! CSK ने ९.५ कोटी मोजत घेतलं ताफ्यात

हर्षल पटेल हैदराबादकडून खेळणार

हर्षल पटेलला संघात घेण्यासाठी हैदराबादने ६.२५ कोटी मोजले आहेत.

जॅक फ्रेजर मॅकगर्क दिल्लीकडूनच खेळणार

राहुल त्रिपाठी सीएसकेच्या ताफ्यात

राहुल त्रिपाठीला चेन्नईने ३.४ कोटींची बोली लावत संघात स्थान दिलं आहे.

चेन्नईला चॅम्पियन बनवणारा खेळाडू गळाला! लागली तब्बत ६.२५ कोटींची बोली

चेन्नई सुपर किंग्ज संघाने आपला स्टार खेळाडू डेवोन कॉनव्हेला पुन्हा संघात घेतलं आहे.

लखनऊचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्ड

गेल्या हंगामात लखनऊकडून खेळणारा पडिक्कल अन्सोल्ड राहिला आहे.

हॅरी ब्रुकची दिल्लीत एन्ट्री! लागली ६.२५ कोटींची बोली

कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? 

केएल राहुल दिल्लीच्या ताफ्यात! लागली इतक्या कोटींची बोली

केएल राहुल दिल्लीच्या ताफ्यात दाखल झाला आहे. या संघाने त्याला आपल्या संघात घेण्यासाठी १४ कोटी रुपये मोजले आहेत.

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज RCB त्या ताफ्यात

लियाम लिविंगस्टनला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने ८.७५  कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

मोहम्मद सिराज गुजरातकडून खेळणार

सिराजला संघात घेण्यासाठी गुजरात टायटन्सने १२.२५ कोटींची बोली लावली आहे.

मोहम्मद शमी हैदराबादकडून खेळणार

सनरायझर्स हैदराबादने शमीला १० कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

पहिल्या यादीत या ६ खेळाडूंवर लागली रेकॉर्डब्रेक बोली

अर्शदीप सिंग - १८ कोटी (पंजाब किंग्ज ) RTM

कगिसो रबाडा - १०.७५ कोटी( गुजरात टायटन्स)

श्रेयस अय्यर -२६.७५ कोटी (पंजाब किंग्ज)

जोस बटलर -१५.७५ कोटी (गुजरात टायटन्स)

मिचेल स्टार्क - ११.७५ कोटी ( दिल्ली कॅपिटल्स)

रिषभ पंत - २७ कोटी (लखनऊ सुपरजायंट्स)

रिषभ पंतवर लागली रेकॉर्डब्रेक बोली! या संघाने लावली २७ कोटींची बोली

लखनऊ सुपरजायंट्सने रिषभ पंतला २७ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

लॉस झाला ना भावा! सर्वात महागड्या स्टार्कवर लागली अवघ्या इतक्या कोटींची बोली

मिचेल स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने ११.७५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

जोस बटलर गुजरातच्या ताफ्यात 

गुजरात टायटन्सने जोस बटलर १५.७५ कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

अय्यरचा भाव वाढला! पंजाबने लावली IPL इतिहासातील सर्वात मोठी बोली

पंजाब किंग्स संघाने श्रेयस अय्यरला २६.७५ कोटींची विक्रमी बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

गुजरातच्या ताफ्यात नंबर १ गोलंदाज

गुजरात टायटन्सने १०.७५ कोटी मोजत कगिसो रबाडाला आपल्या संघात घेतलं आहे.

आयपीएलची पहिली बोली १८ कोटींची! स्टार गोलंदाजावर लागली सर्वात मोठी बोली

अर्शदीप सिंगला हैदराबादने आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र RTM चा वापर करत पंजाबने त्याला आपल्या संघात कायम ठेवलं. ही आयपीएल लिलावात भारतीय गोलंदाजावर लागलेली सर्वात मोठी बोली आहे.

आयपीएल लिलावाला सुरुवात! कोण होणार मालामाल?

आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये सुरु आहे. या लिलावात ५७४ खेळाडूंवर बोली लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com