Accused sentenced to life imprisonment in Pune murder case involving former Ganpati mandal president Saam TV
मुंबई/पुणे

अनैतिक संबंधांवरून वाद, गणपती मंडळाच्या माजी अध्यक्षाची हत्या; दोघांना जन्मठेप, वडिलांसह मुलांना मिळणार भरपाई

Pune Illicit Relationship Murder Case Full Details: अनैतिक संबंधांवरील वादातून पुण्यातील गणपती मंडळाच्या माजी अध्यक्षाची निर्घृण हत्या करण्यात आली. न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून पीडिताच्या कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे: अनैतिक संबंधामुळे इमारतीतील रहिवाशांना त्रास होत असल्याच्या कारणावरून महिलेसमोरच मारहाण केल्याच्या रागातून गणेश मंडळाच्या माजी अध्यक्षाचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय अनंत मोहोळ (वय ३९, रा. दत्तवाडी) आणि संभाजी सदाशिव कांबळे (वय २७, रा. कोथरूड) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना जन्मठेपेसह २७ हजारांचा दंडही ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त दोन महिन्यांचा कारावास भोगावा लागेल असे निकालात नमूद केले आहे.

सागर शिंदे (वय ३१, रा. कर्वे रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. ते एरंडवणे येथील एका गणेश मंडळाचे माजी अध्यक्ष होते. या प्रकरणी त्याचे वडील शिवाजी शिंदे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. २३ फेब्रुवारी २०१६ रोजी सागर हे दुचाकीवरून करिष्मा चौकाकडे निघाले होते.यावेळी आरोपींनी चारचाकीतून येत त्यांच्या दुचाकीला धडक दिली.रस्त्यावर पडल्यानंतर सागर आरोपींना पाहून त्या ठिकाणाहून पळून जाऊ लागले.

आरोपींनी पाठलाग करत त्यांच्यावर कोयत्याने वार तसेच दगडाने ठेचून गंभीर जखमी केले होते.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणीअलंकार पोलिसांच्या वतीने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्यांनी १८ साक्षीदार तपासले. या प्रकरणात दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि दोन डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. दंडाच्या रक्कमेतून सागर यांच्या वडील आणि मुलांना नुकसान भरपाई देण्याचेही आदेशात कोर्टाने नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT