Gateway To Mandwa Ferry Service Saam TV
मुंबई/पुणे

Gateway To Mandwa Ferry: अलिबागसाठी वीकेंड प्लान करत असाल तर थांबा, गेटवे- मांडवा सागरी वाहतूक 3 महिन्यांसाठी बंद

Mumbai To Alibaug Ferry: गेटवे ते मांडवा सागरी वाहतूक (Gateway To Mandwa Ferry Service) तब्बल 3 महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे.

Priya More

Mumbai To Alibaug Ferry Update:

मुंबईवरुन मांडवा अथवा अलिबागला (Alibaug) फिरायला जाण्यासाठी प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण आता अलिबागला जाण्यासाठी तुम्हाला समुद्रा मार्गे प्रवास करता येणार नाही. यासाठी तुम्हाला पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. यामागचे कारण म्हणजे गेटवे ते मांडवा सागरी वाहतूक (Gateway To Mandwa Ferry Service) तब्बल 3 महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहे.

मुंबईच्या नजीकचे पर्यटनस्थळ म्हणून अलिबागकडे पाहिले जाते. अगदी एका तासामध्ये तुम्ही समुद्रा मार्गे प्रवास करुन अलिबागमध्ये पोहचू शकता. त्यामुळे या प्रवासाला प्रत्येक जण जास्त प्राधान्य देतात. रस्ते मार्गावरुन तीन ते साडेतीन तासांचा प्रवास करण्यापेक्षा मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का इथून बोटीने म्हणजेच फेरीने प्रवास करत अलिबाग गाठता येते. त्यामुळे वेळ देखील वाचतो आणि मजा-मस्ती देखील करण्यास जास्त वेळ मिळतो. तसंच या मार्गे प्रवास करण्याची देखील मजा घेता येते. त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती या प्रवासाला असते.

पण आता मांडवा ते गेट वे या मार्गावर सुरु असणारी जल वाहतूक 26 मे ते 31 ऑगस्ट या कालावाधीमध्ये बंद राहणार आहे. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ ही वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. मेरी टाईम विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या विभागांना यासंदर्भातील सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. भाऊच्या धक्क्यावरून M2M रो-रो फेरी सेवा मात्र सुरु राहणार आहे. त्यामुळे अलिबागला जाणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे.

गेट वे ते मांडवा याठिकाणी जाण्यासाठी असणाऱ्या सर्वच फेरी सेवा बंद असणार आहेत. मालदार, अजंठा, पीएनपी आणि अपोलो या जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांची सेवाही बंद राहण्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईवरुन अलिबागला जाणारे पर्यटक नाराज झाले आहेत. अशामध्ये रो-रो सेवा सुरु राहणार असल्यामुळे या पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पण इतर फेरींपेक्षा रो-रो फेरीसाठी या पर्यटकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. नाहीतर त्यांना रस्ते मार्गाने वाहतूक करुन अलिबाग गाठावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT