Nana patole  saam tv marathi
मुंबई/पुणे

राज्याच्या तिजोरीवर एका लुटारुला बसवत असाल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; नाना पटोलेंचा हल्लाबोल

‘मित्र’च्या उपाध्यक्षपदी अजय आशरच्या नियुक्तीला फडणवीसांची सहमती आहे का? नाना पटोलेंचा थेट सवाल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक, मुंबई

Nana Patole latest News: केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच महाराष्ट्र इन्फरमेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच 'मित्र'ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे. अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (Maharashtra Politics News)

यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी नगर विकास विभागाचे निर्णय घेणारे अजय आशर नावाची व्यक्ती कोण? असा सवाल विचारला होता. देवेंद्र फडणवीस त्यावेळी विरोधी पक्षनेते होते व त्यांचाही असाच आक्षेप होता.

आता त्याच लुटारु व्यक्तीची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकार निती आयोगासारख्या महत्वपूर्ण संस्थेत कॅबिनेट दर्जाच्या उपाध्यक्षपदी कशी करू शकतात? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची अजय आशर यांच्या नियुक्तीला सहमती आहे का? तसेच कर्नाटकला महाराष्ट्रातील काही गावे देण्याचा घाट घातला जात आहे, उद्योग गुजरातला जात आहेत तसेच राज्याची तिजोरी लुटायचा निर्णय घेतला आहे का? याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे.

अजय आशर या व्यक्तीबद्दल भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात आक्षेप घेतला होता. मग आता भाजपाचे मनपरिवर्तन झाले आहे का? काल ज्या व्यक्तीवर आक्षेप घेतला त्याच व्यक्तीच्या हाती राज्याची तिजोरी देणे कितपत योग्य आहे? या नियुक्तीमागे भाजपाचाही काही स्वार्थ आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे. काँग्रेस पक्षाचा या महत्वाच्या पदावर एका लुटारूची नियुक्ती करण्यास तीव्र विरोध आहे. वेळ पडल्यास हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर आवाजही उठवू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT