Devendra Fadnavis: ज्यांना रामाचं अस्तित्व मान्य नाही, त्यांना रावण लक्षात आहे; गुजरातमध्ये फडणवीस कडाडले

Devendra Fadnavis Latest News: अहमदाबाद येथील भाजप मीडिया सेंटरमध्ये एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
Devendra fadnavis News
Devendra fadnavis Newssaam tv

Gujrat Election News: गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाला सुरूवात झालेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या अहमदाबादमध्ये आहे. गुजरात निवडणुकीसाठी ते स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. यावेळी एका सभेत त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. खरगे यांनी पंतप्रधान मोदींना रावणाची उपमा दिली होती, त्या वक्तव्याचा फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ज्यांना रामाचं अस्तित्व मान्य नाही त्यांनी आज रावण आठवतोय अशी बोचरी टीका फडणवीसांनी केली आहे. (Gujrat Election Latest News)

Devendra fadnavis News
Maharashtra Politics: राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षांना पदावरुन हटवलं; मविआला शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक झटका

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एका सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, जेव्हा-जेव्हा कॉंग्रेसचा पराभव होतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी शिव्या, शिव्याशाप असे शब्द त्यांच्या नेत्यांच्या तोंडून हताशपणे बाहेर पडतात. म्हणजेच निवडणूक (Gujrat Election 2022) निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेसने पराभव स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे असं फडणवीस म्हणाले आहेत. अहमदाबाद येथील भाजप मीडिया सेंटरमध्ये एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.

फडणवीसांच्या ट्विटर हॅण्डलवरुन गुरुवारी ट्विटरवर त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेयर केला गेला. ज्यात ते म्हणाले, 'निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा कॉंग्रेसला त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे. आजपर्यंतचा इतिहास पाहा, जेव्हा-जेव्हा काँग्रेसला पराभव स्पष्ट दिसू लागतो, तेव्हा काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या घालू लागतात. त्यांच्याकडे मोदींच्या विकासाच्या मॉडेलला तोड नाही. यापेक्षा मोठे मॉडेल ते आणू शकत नाहीत, दाखवू शकत नाहीत, विचार करू शकत नाहीत, हे लक्षात येताच काँग्रेसचे नेते मोदींना शिव्या घालू लागतात असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

'काँग्रेसकडे नेताही नाही, धोरणही नाही'

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींना शिव्या देऊन काँग्रेसने पराभव स्वीकारल्याचे सिद्ध केले आहे. मोदींच्या विकास मॉडेलला त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांच्याकडे ना नेता आहे ना धोरण. त्यामुळे त्यांच्या भाषेची पातळी येथे आली आहे.

Devendra fadnavis News
Swasthyam 2022: शरीराच्या आणि मनाच्या सुदृढ आरोग्यासाठी पुण्यात 'स्वास्थ्यम्'; जाणून घ्या सविस्तर...

'मोदींची रावणाशी तुलना करणारे रावणाचे चाहते'

फडणवीस म्हणाले, माझा प्रश्न आहे की रावणाच्या पाठीशी कोण उभे आहे? ज्याने रामलल्लाचे अस्तित्व नाकारले की राम मंदिर बांधणारे मोदी? 700 वर्षांचा कलंक पुसून मोदी रामलल्लाच्या मंदिराच्या उभारणीला सुरुवात करत होते, तेव्हा तीच काँग्रेस विचारत होती की रामलल्लाचा जन्म झाला का? त्यामुळेच आज काँग्रेस येथे उभी आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच जेव्हा जेव्हा काँग्रेस आणि विरोधक मोदींना शिव्या देतात तेव्हा जनता त्यांना पूर्वीपेक्षा जास्त मतांनी विजयी करून कॉंग्रेसला त्यांची जागा दाखवते. मला माफ करा, मी असे शब्द वापरत आहे, परंतु कधीकधी अशा शब्दांचा वापर करणे आवश्यक होते असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com