Ice cream Saam Digital
मुंबई/पुणे

Ice cream : ऑनलाईन आईसस्क्रिम मागवताय, सावधान! आईसस्क्रीममध्ये सापडलं माणसाचं बोट; व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय?

Ice cream : तुम्ही जर ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी. एका व्यक्तीनं ऑनलाईन आईसस्क्रीम मागावलं. ते आईस्क्रीम खाताना त्या व्यक्तीच्या पायाखालची वाळूच सरकली.

Sandeep Gawade

मयुरेश कडव, साम टीव्ही प्रतिनिधी

तुम्ही जर ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी. एका व्यक्तीनं ऑनलाईन आईसस्क्रीम मागावलं. ते आईस्क्रीम खाताना त्या व्यक्तीच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण त्या आईस्क्रीममध्ये चक्क माणसाच्या हाताचं बोट आढळून आलं. याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय, काय आहे हा सगळा प्रकार. पाहूयात हा रिपोर्ट

यंदाचा उन्हाळा जरा जास्तच कडक आहे. त्यामुळे आईसस्क्रिमची मागणी वाढलीय. बाजारात वेगवेगळ्या फ्लेव्हरमध्ये आईसक्रीम उपलब्ध आहे. ऑनलाईन आईसस्क्रीम मागवणाऱ्यांची संख्याही कमी नाही. मात्र आता हा व्हिडीओ पाहल्यानंतर तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही..(प्ले व्हिडीओ) ही साधीसुधी आईस्क्रिम नक्कीच नाही. या आईस्क्रिममध्ये चक्क माणसाचं बोट आढळून आलंय. (प्ले व्हिडिओ)

व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात सवाल उपस्थित झाले आहेत. कोणता आईसस्क्रिमचालक आपल्या ग्राहकांना अशी आईसस्क्रिम देऊ शकतो? यात काही काळंबेरं आहे का? साम टीव्हीनं या व्हिडीओची पडताळणी केली. तेव्हा घडलेला सगळा प्रकार समोर आला.

हा व्हिडीओ मुंबईतल्या मालाडमधला आहे. ब्रँडन फेराओ नावाच्या व्यक्तीनं यम्मो आईसस्क्रिमवरून ऑनलाईन आईसस्क्रीम मागवली होती. त्यानं अर्ध्याहून अधिक आईसस्क्रीम खाल्ली. मात्र त्याचवेळी आईसस्क्रीममध्ये गडबड असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्या आईसस्क्रीममध्ये माणसाच्या हाताचं बोट होतं. ब्रँडन स्वत: डॉक्टर असल्यानं त्यांनी तत्काळ हे बोट बर्फात ठेवलं आणि पोलिसांना याची माहिती दिली.

याप्रकरणी मालाड पोलिसांनी यम्मो आईसस्क्रिमविरोधात गुन्हा दाखल केलाय. तसच बोटाचे अवशेष फॉरेन्सिंक तपासणीसाठी पाठवले आहेत. आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडीओ खरा असल्याचं स्पष्ट झालंय. आता आईसस्क्रिममधलं हे बोट नेमकं कुणाचं आहे? यामागे काही काळंबेरं तर नाही ना? याचा उलगडा पोलिस तपासानंतरच होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Maharashtra Politics: मनसेला EVM वर भरोसा नाय का? अपयशाची सल, EVMमधून खल?

Arjun Tendulkar: सचिनचा लेक रिकाम्या हाती परतला! अर्जुन तेंडुलकर अन्सोल्ड

Maharashtra Politics : अमित शहा उद्याच मुंबईत येणार, मुख्यमंत्रिपदाची घोषणा करणार? पडद्यामागे काय घडतंय? वाचा

Sharad Pawar Speech : यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले, मातोश्रींना माहीतच नव्हतं; शरद पवारांनी सांगितला तो किस्सा

SCROLL FOR NEXT