IAS Pooja Khedkar Saam Tv
मुंबई/पुणे

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर आणखीच गोत्यात, 'त्या' प्रकरणाची होणार चौकशी

Pooja Khedkar Problem Increase: आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वायसीएम हॉस्पिटलला चौकशी करण्याचे आदेश दिले.

Priya More

गोपाल मोटघरे, पिंपरी-चिंचवड

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकरी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे. पूजा खेडकर यांनी आयएएस अधिकारी बनण्यासाठी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. आता याप्रकरणी पुणे जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलला याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची चौकशी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वायसीएम हॉस्पिटलला चौकशी करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार वाय सी एम हॉस्पिटलमधील डॉक्टर हे निर्दोष असल्याची माहिती या हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे. आम्ही संबंधित डॉक्टरांकडून पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबद्दल अहवाल मागवला होता. त्यात त्यांनी पूजा खेडकर यांची योग्य तपासणी करून शासकीय निकषानुसार त्यांना ७ टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिलं होतं.

दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे पूजा खेडकर यांना शिक्षणात किंवा शासकीय नोकरीत कोणताही लाभ घेता येत नाही, असे स्पष्टीकरण वाय सी एम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे यांनी दिले आहे. त्याचबरोबर, 'पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी जे रेशन कार्डचा जो बनावट पत्ता सादर केला होता. त्याविषयी आम्ही काही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. या विषयाची दखल संबंधित खात्याने घ्यायला हवी.', असे स्पष्टीकरण राजेंद्र वाबळे यांनी दिले आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांनी आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे भासवून कमी उत्पन्न दाखविण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांचे आई-वडील मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर या दाम्पत्याचा खरच घटस्फोट झाला आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने पुणे पोलिसांना दिले आहे. पूजा खेडकर या सध्या नॉटरिचेबल आहेत. पुणे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा नोटीस पाठवली. पण त्या अद्याप चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत. त्या नॉटरिचेबल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT