संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ह मराठी
Dog sexually assaulted in Kandivali East Mumbai : मुंबईत माणुसकीला लाजवणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. कांदिवली (पूर्व) मध्ये एका नराधमाने कुत्र्यावर उघड्या गटारात लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण कांदिवलीत संतापाची लाट उसळली आहे. या विकृत कृत्यामुळे प्राणिप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांना आणि प्राणिप्रेमींना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईच्या कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला परिसरात एका विकृत व्यक्तीने मादी कुत्र्याला जखमी करत उघड्या गटारात लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. समता नगर पोलिसांनी संजय एम. गौड या नराधमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुत्रीच्या विव्हळणाऱ्या किंकाळ्या ऐकून स्थानिक रहिवाशांनी धाव घेत आरोपीला रंगेहाथ पकडले. त्यानंतर पेटा इंडिया आणि मार्मिक अॅनिमल वेल्फेअर फाउंडेशनच्या मदतीने बीएनएस कलम ३२५ तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० च्या कलम ११(१)(अ) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला.
मात्र, या अमानवी कृत्या इतकीच धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी केवळ ‘प्राण्यांवरील क्रूरता’ या कलमाखालीच गुन्हा नोंदवला. सध्याच्या कायद्यात प्राण्यांवर बलात्कार किंवा अनैसर्गिक लैंगिक अत्याचारासाठी ठोस कलमच नसल्याचे कारण देण्यात आले. हा कायद्याचा पोकळपणा की व्यवस्थेची असंवेदनशीलता, असा सवाल प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे, पंधरा दिवसापूर्वी याच परिसरात एका विकृत तरुणाने कुत्र्याच्या अडीच महिन्याच्या पिल्लावर सार्वजनिक शौचालयात अत्याचार केले होते.. हे केवळ एक प्रकरण नसून समाजात वाढत चाललेल्या विकृतीचे भयावह लक्षण आहे. जखमी मादी कुत्रीवर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून तिच्या वेदनांसाठी जबाबदार असलेल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. मूक प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या विकृत प्रवृत्तींना जर वेळीच चिरडले नाही, तर उद्या माणुसकीच सुरक्षित राहील का, हा प्रश्न गंभीरपणे विचारात घ्यावा लागे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.