उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या शाखेतच वाद झालाय. नेहरूनगर येथील शाखा क्रमांक १६९ मध्ये नगरसेविका प्रविणा मोरजकर यांचे पती मनीष मोरजकर आणि विधानसभा प्रमुख अश्विन मलिक मेश्राम यांच्यात वाद झाला. या वादामुळे शाखेच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, नगरसेविका प्रविणा मोरजकर यांचे पती मनीष मोरजकर हे काही पदाधिकाऱ्यांसह आधीच शाखेत उपस्थित होते.
त्याचवेळी विधानसभा प्रमुख अश्विन मलिक मेश्राम हे एका कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाखेत आले होते. मात्र, त्यांना शाखेत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप आहे.शाखेत प्रवेश देण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. या घटनेमुळे ठाकरे गटातील स्थानिक पातळीवरील मतभेद उघड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.