Inspirational Story Saam Tv
मुंबई/पुणे

12th HSC Result : दृष्टिहीन विद्यार्थ्यांची नेत्रदीपक कामगिरी, बारावीच्या परीक्षेत चौघांना घवघवीत यश

Success Story of Blind Students Pass In HSC: कितीही अडचणी असल्या तरीही त्यावर मात करायची असते. हेच पुण्यातील आणि नागपूरातील काही विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. दृष्टीहीन असतानाही त्यांनी बारावीची परीक्षा पास केली आहे.

Siddhi Hande

काल राज्य उच्च माध्यमिक मंडळाने बारावीचे निकाल जाहीर केला आहे. बारावीच्या परीक्षेच्या महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे. अनेकांनी अनेक संकंटावर मात करुन हे यश मिळवलं आहे. बारावीच्या परीक्षेत पुण्यातील एका दृष्टीहीन विद्यार्थ्याने ८०.५० टक्के गुण मिळवले आहे. तर नागपूरच्या इम्तियाज खान या मुलानेदेखील दृष्टीहीन असतानाही चांगले गुण मिळवले आहे. त्याने ७९.८३ टक्के गुण मिळवले आहे.

पुण्याच्या अक्षय दंडवतेची कहाणी

पुणे शहरातील बी.एम.सी.सी. महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असलेल्या अक्षय दंडवते या दृष्टीहीन विद्यार्थ्याने अभूतपूर्व यश मिळवलं आहे.परीक्षेसाठी कुठल्याही लेखनिकाची मदत न घेता अक्षयने स्वतः संगणकाच्या मदतीने टाईप करून सगळे पेपर दिले आहेत.आज त्याला ८०. ५०% गुण मिळाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठी दृष्टीहीन विद्यार्थ्यांना लेखनिकाची सुविधा घेता येते.असं असलं, तरी अक्षयने ती सुविधा नाकारत स्वतः संगणकाच्या मदतीने पेपर देण्याचा निर्णय घेतला.स्वतःचे पेपर स्वतः दिले आणि हे यश संपादित केलं.' दृष्टीपेक्षा दृष्टिकोन महत्त्वाचा असतो' हे त्याने सिद्ध केलं आहे. त्याच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

12th HSC Result

नागपूरच्या इम्तियाज खाननेदेखील ब्रेलच्या माध्यमातून केला अभ्यास

बारावीचा रिझल्ट लागला यात आंबेडकर विद्यालयातील कला शाखेतील इम्तियाज खान हा प्रज्ञाचक्षु असताना सुद्धा डोळस कामगिरी करून दाखवली. ब्रेलच्या माध्यमातून दैनंदिन सराव करत अभ्यास केला.यात त्याला 79.83 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला. त्याला भविष्यात न्याय मिळवून देण्यासाठी वकील होण्याचं स्वप्न उराशी बाळगतोय.

गणितात १०० पैकी १०० गुण

अनेकांना गणित ,संस्कृत, किंवा अकाउंट यासारखे विषय कठीण वाटत असेल तरी 100 पैकी 100 गुण मिळवणारी विद्यार्थ्यांची कामगिरी डोळ्याची पावर ठरली. यात विज्ञान शाखेतील अमोघ गोतमारे त्यांनी गणित विषयाचा दैनंदिन सराव करत 100 पैकी 100 गुण मिळवले. रुचिका बाकरे ह्या विद्यार्थिनीने वाणिज्य शाखेतून संस्कृत विषयात तसेच अकाउंट मध्ये पूर्णपैकी पूर्ण गुण मिळवत अभ्यासाचा मंत्र सांगितला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT