Beed News: कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पदावरून हकालपट्टी

Shivsena Thakceray Group Leader Ratnakar Shinde: बीडमध्ये कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे प्रकरण समोर येताच ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Beed News: कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाची पदावरून हकालपट्टी
Shivsena Thakceray Group LeaderSaam Tv
Published On

योगेश काशिद, बीड

बीडमधील राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बीड जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदेंना पदावरून पुन्हा हटवण्यात आले आहे. कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा ठपका ठेवत पुन्हा त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. २ दिवसांपूर्वी डमी ग्राहक पाठवून पोलिसांनी रेड टाकली होती. यावेळी १० पीडितांची सुटका करत ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांचे नाव नव्हते. पण हे कलाकेंद्र तेच चालवत असल्याचा ठपका आहे. त्यानंतर पक्षाकडून त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. त्यांना पुन्हा पदावरून हटवण्यात आले.

Beed News: कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाची पदावरून हकालपट्टी
Beed Police Suspended : बीड पोलिसांच्या मागे निलंबनाचा ससेमिरा; कासले, नागरगोजे अन् आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह महिला निलंबित

केज तालुक्यातील उमरी येथील महालक्ष्मी कला केंद्रावर कारवाई झाल्यानंतर रत्नाकर शिंदेंना पदावरून हटवण्यात आले. यापूर्वी देखील कला केंद्र चालवत असल्यानेच त्यांना पदावरुन हटवण्यात आले होते. मात्र पुन्हा काही दिवसांनी त्यांची पदावर नियुक्ती झाली होती. तरीही कला केंद्राचा व्यवसाय चालूच होता.

यानंतर दोन दिवसांपूर्वी केज पोलिसांनी कला केंद्रावर रेड मारली. यावेळी कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. यानंतर शनिवारी शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाने रत्नाकर शिंदे यांना पदावरून हटवले.

Beed News: कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखाची पदावरून हकालपट्टी
Beed Shocking:'मी फक्त तुझ्यासाठी घरी येतो, माझ्या मांडीवर बस'; बीडच्या पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्याचं मुलीसोबत अश्लील कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com