Devendra Fadnavis On Pune Traffic Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic Solution: पुण्याची वाहतूक कोंडी कशी सुटणार? देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्लान सांगितला

Devendra Fadnavis On Pune Traffic: पुणेकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे.

Saam Tv

सचिन जाधव, साम टीव्ही, प्रतिनिधी

पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठा आहे. वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अक्षशः वैतागले आहेत. रोज अनेक तास पुणेकरांचे वाहतूक कोंडीमुळे वाया जातात. यातच आता पुण्याची वाहतूक कोंडीपासून सुटका कधी होणार, असा प्रश्न अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे. याचेच उत्तर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिलं आहे.

आज पुण्यात सात नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''पुण्यात वाहतूक खूप वाढली आहे. यामध्ये अधिकारी वाढवायचा निर्णय घेतला आहे. एक अतिरिक्त आयुक्त, एक उपायुक्त देणार आहोत. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपयोग होईल.''

याच कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''आजच आपण सायबर सेंटर सुरू करत आहोत. साडे सातशे कोटी रुपये खर्च करून उभा केला आहे. अनेकदा पैसे जातात येत नाही.'' ते म्हणाले, ''मागच्या काळात आपण गुगलसोबत एक करार केला आहे, त्यात आता एआय उपयोग कसा करायचा, याचं काम पण सोपं आहे. ट्रॅफिकसाठी याचा उपयोग होणार आहे. त्यात सगळं शक्य आहे. ड्रोनचा वापरही केला जाणार आहे.''

फडणवीस म्हणाले, ''देशात नवीन तीन कायदे आणले आहेत. पोलीस यांच्यावर जास्त जबाबदारी टाकली आहे. 2014 नंतर आपण निर्णय घेतल की, टेक्निकल पुरावे आपण गोळा करून गुन्हे सिद्ध करण्यास मदत होत आहे.''

ते पुढे म्हणाले, ''माझ्या काळात 40 हजार पोलीस भरती केली आहे आहे. कमी संख्या होती. गुन्हे घडताना दिसत आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तोवर गुन्हे घडणार, त्यांना शिक्षा होते का? त्याची उखल होते का? लोकांना सेफ वाटतं का? हे महत्वाचे आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

SCROLL FOR NEXT