Mhada Lottery Saam Tv
मुंबई/पुणे

Mhada Lottery: म्हाडा लॉटरीकडे मुंबईकरांनी फिरवली पाठ! आठ दिवसात फक्त ५४०३ अर्ज; अल्पप्रतिसादाचे नेमकं कारण काय?

Mumbai Mhada Lottery: अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीला म्हाडाने अवघे 26 दिवस दिले असताना पहिल्या आठ दिवसामध्ये केवळ ५४०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हाडाच्या घरांना अल्पप्रतिसाद मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Gangappa Pujari

संजय गडदे | मुंबई, ता. १७ ऑगस्ट २०२४

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या घरांच्या सोडतीला अल्पप्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत आहे. अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीला म्हाडाने अवघे 26 दिवस दिले असताना पहिल्या आठ दिवसामध्ये केवळ ५४०३ अर्ज प्राप्त झाले आहेत. म्हाडाच्या घरांना अल्पप्रतिसाद मिळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठी अर्जदारांची अक्षरश: झुंबड उडते. परंतु यंदा मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. अर्ज नोंदणी आणि स्विकृतीला म्हाडाने अवघे 26 दिवस दिले असताना पहिल्या आठ दिवसात फक्त ५४०३ अर्ज प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एकीकडे म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किमती वाढल्या असताना अॅपमधून अर्ज सादर करताना अर्जदारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हेच यामागचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. पहिल्या आठ दिवसात प्राप्त झालेल्या 5403 अर्जांपैकी 3243 अर्जदारांनी अनामत रक्कम देखील भरली आहे.

म्हाडातर्फे २०३० घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि स्वीकृतीला गेल्या शुक्रवारपासून सुरुवात झाली. इच्छुकांना अर्ज सादर करण्यासाठी जेमतेम २५ ते २६ दिवस मिळाल्याने पहिल्या दिवसापासूनच अर्जदारांची झुंबड उडेल, अशी काहीशी आशा होती.

प्रत्यक्षात आठवडा उलटूनही अर्जदारांचा लाॅटरीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. आठवड्याभरात केवळ ५४०३ जणांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३२४३ जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत. गेल्यावर्षी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांसाठी सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

SCROLL FOR NEXT