Mumbai News : प्रवासात हरवले ३५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने; सीसीटीव्ही तपासत लावला शोध, ओशिवरा पोलिस पथकाने केले परत

Mumbai News : ओशीशिरा जोगेश्वरी येथील नातेवाईकांच्या घराजवळील जुबेर वाईन शॉप समोर त्यांनी उबर कार सोडून दिली. दुसऱ्या दिवशी घरातील बॅगा तपासताना ३५ तोळे सोने असलेली बॅग आढळून आली नाही
Mumbai News
Mumbai NewsSaam tv
Published On

संजय गडदे 

मुंबई : पालघर ते जोगेश्वरी असा कारने प्रवास करत असताना २५ लाख रुपये किमतीचे ३५ तोळे सोन्याचे दागिने गहाळ झाले होते. याप्रकरणी पालघर येथील रहिवासी नजीरूल याकूब हसन यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने ही बॅग शोधून त्यांना ती मुद्देमालासह परत केली. हरवलेले दागिने परत मिळवून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Mumbai News
Pimpri Chinchwad Corporation : विनापरवानगी रस्ता खोदाई पडली महागात; बांधकाम व्यावसायिकाला ७ कोटींचा दंड


पालघर (Palghar) येथील हसन कुटुंबीय उबर टॅक्सीने ९ ऑगस्टला जोगेश्वरी येथील नातेवाईकांकडे निघाले होते. ओशीशिरा जोगेश्वरी येथील नातेवाईकांच्या घराजवळील जुबेर वाईन शॉप समोर त्यांनी उबर कार सोडून दिली. दुसऱ्या दिवशी घरातील बॅगा तपासताना ३५ तोळे सोने असलेली बॅग आढळून आली नाही. यामुळे १२ ऑगस्टला दुपारी नजरुल याकूब हसन यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. 

दरम्यान झोन ९ चे डीसीपी राज तिलक रोशन आणि ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो. नि. मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण अधिकारी सपोनि पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांनी तक्रारदार ज्या ठिकाणावरून कारमध्ये बसले आणि ज्या ठिकाणी उतरले. तेथील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. उबर कार चालकाचा पत्ता शोधून कार चालक शंकर बन्सी शिंदे हा उल्हासनगर येथे असल्याचे तपास पथकाला समजले. पोलिसांनी चालकाच्या मोबाईलवर संपर्क साधून बॅग संदर्भात विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पुन्हा फोन केला असता त्याने फोन उचलणे बंद केले. 

Mumbai News
Dhule News : रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून नशामुक्त महाराष्ट्र करा; शेकडो पत्र पाठवून महिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पोलिसांनी चालकाच्या पत्नीचा मोबाईल शोधून त्यावर फोन केला असता तिने एक बॅग कारमध्ये सापडल्याची माहिती पोलिसांना दिली. शिवाय त्यातील वस्तू देखील तशाच आहेत हे देखील पोलिसांना सांगितले. माहितीची खातरजमा करताच गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सपोनि संदीप पाटील, यांच्यासह तपास पथकाने उल्हासनगर येथे जाऊन ३५ तोळे सोन्याची बॅग पुन्हा मिळवली आणि तक्रारदारांच्या स्वाधीन केली. आपले हरवलेले दागिने पुन्हा मिळाल्यामुळे तक्रारदार नजीरूल याकूब हसन आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ओशिवरा पोलिसांचे आभार मानले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com