पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत विनापरवाना रस्ते खोदाई करणे बिल्डरला चांगलंच भोवल आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत बेकायदेशीर रस्ते खोदाई केल्याप्रकरणी महापालिकेने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गेरा बिल्डर यांच्याकडून जवळपास ६ कोटी ९४ लाख ८ हजार ८०० रुपये रुपये इतका दंड वसूल केला आहे.
बांधकाम व्यावसायिक किंवा काहीजण आपल्या कामासाठी अनेकदा कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता रस्त्यांची खोदाई करत असतात. मात्र काम झाल्यानंतर त्याची दुरुस्ती देखील करत नसतात. याकडे बऱ्याचदा महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. दरम्म्यान (Pimpri chinchwad corporation) पिंपरी- चिंचवड शहरातील महापालिकेचे स्थापत्य विभागाकडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता गेरा बिल्डर या बांधकाम व्यावसायिकाने आपल्या प्रकल्पातील भूमिगत विजेची तार टाकण्यासाठी बेकायदेशीरपणे रस्ते खोदाई केली होती.
गुन्हा दाखल करत दंड केला वसूल
नाशिक फाटा ते गेरा इम्पेरियल गेटवे इथपर्यंत गेरा बिल्डरने बेकायदेशीर रस्ते खोदाई केली होती. या प्रकरणात महापालिकेच्या तक्रारीवरून गेरा बिल्डर विरोधात कायदेशीर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गेरा बिल्डरकडून १ ऑगस्ट २०२४ ला महापालिकेच्या कोषागारात ६ कोटी ९४ लाख ८ हजार ८०० रुपये इतका दंड भरण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.