Hingoli Heavy Rain : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा पावसाचा हाहाकार; राज्य मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद

HIngoli News : हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर मध्यरात्री सलग चार तास कोसळलेल्या या पावसामुळे अनेक भागातील ओढे व नाल्यांना पूर
Hingoli Heavy Rain
Hingoli Heavy RainSaam tv
Published On

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे आगमन झाले असून रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे हिंगोली ते संभाजीनगर रस्त्याचे काम सुरू असलेल्या राज्य मार्गावर पाणी साचले असल्याने मागील तीन तासांपासून वाहतूक व्यवस्था बंद झाली आहे. शिवाय शेतात देखील पाणी साचल्याने २५ हेक्‍टरपेक्षा जास्त शेतीचे देखील नुकसान झाले आहे.

Hingoli Heavy Rain
Germany Driver Jobs : महाराष्ट्रातील वाहनचालकांना जर्मनीत मिळणार नोकरी, कशी ते पाहा VIDEO

हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर मध्यरात्री सलग चार तास कोसळलेल्या या पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागातील ओढे व नाल्यांना पूर आला आहे. तर औंढा- जिंतूर राज्य मार्गावर रस्त्याचे काम सुरू असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मागील तीन तासांपासून हिंगोली संभाजीनगर राज्य महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णतः बंद करण्यात आली आहे. यामुळे वाहन धारकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत. पाणी ओसरल्यानंतरच वाहतूक सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

Hingoli Heavy Rain
Manoj Jarage Patil: मनोज जरांगेंचं मिशन विधानसभा, पुण्यातील सर्व मतदारसंघाचा अहवाल मागवला; कुणाला मिळणार तिकीट?

शेतातील पिके पाण्याखाली 

दरम्यान या राज्य मार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे या परिसरातील ३० हेक्‍टरपेक्षा जास्त शेतीमधील हळद, कापूस, सोयाबीन या पिकांचे देखील रस्त्यावरील पाणी शेतात घुसल्याने नुकसान झाले आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक व्यवस्था बंद असल्याने राज्य मार्ग प्रशासनाने कंत्राटदाराला तातडीने सूचना देत वाहतुकीसाठी हा मार्ग मोकळा करायला सुरुवात केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com