Kalyan crime
Kalyan crimeSaam tv

Kalyan crime : भंगार दुकानात मजुरांच्या मालावर डल्ला; दोघे सराईत चोरटे ताब्यात

Kalyan News : कल्याण शीळ रोडवर भंगार दुकानातून दोघं चोरट्यानी या दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे साहित्य चोरून नेले होते
Published on

अभिजित देशमुख
कल्याण
: कल्याण शीळ रोडवर असलेल्या भंगार मालाच्या दुकानात मोलमजुरी करणाऱ्या मजुरांच्या मोबाईल फोनसह वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करण्यात आली होती. चोरी करणाऱ्या या दोन सराईत चोरट्यांना क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने बेड्या ठोकल्या आहेत.  चोरट्यांकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Kalyan crime
Hingoli Heavy Rain : हिंगोली जिल्ह्यात पुन्हा पावसाचा हाहाकार; राज्य मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद

कल्याण (Kalyan) शीळ रोडवर भंगार दुकानातून दोघं चोरट्यानी या दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे साहित्य चोरून नेले होते. याची माहिती पोलिसांना (Police) देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता. दरम्यान चोरीचे मोबाईल आणि वाहनांच्या बॅटऱ्या विकण्यासाठी कल्याण- शिळ महामार्गावर असलेल्या कोळेगावाजवळ दोघेजण येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचला मिळाली. या माहितीच्या आधारे क्राईम ब्रांचच्या पथकाने सापळा रचत दोघांना बेड्या ठोकल्या. अनुराग मंडराई व इरफान शेख या दोघांना ताब्यात घेतलेल्या चोरट्याची नावे आहेत. 

Kalyan crime
Dhule News : स्वतःला जाळून घेणाऱ्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू; घटनेपूर्वी काय घडले सीसीटीव्हीमध्ये कैद

दोघांवर यापूर्वीही घरफोडीचे गुन्हे 

हे दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. यातील इरफान शेख याच्यावर मानपाडा, रामनगर आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात घरफोड्यांचे तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. तर अनुराग मंडराई याच्यावर देखील मानपाडा, रामनगर आणि टिळकनगर पोलिस ठाण्यात घरफोड्यांचे ५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com