म्हाडाच्या घरांच्या किंमती होणार कमी? मोठ्या अधिकाऱ्याने दिले संकेत
Mhada House Saam TV

Mhada News: म्हाडाच्या घरांच्या किंमती होणार कमी? मोठ्या अधिकाऱ्याने दिले संकेत

Mumbai News: म्हाडाकडून भविष्यात काढल्या जाणाऱ्या लॉटरीतील घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील, अशा ठेवण्याचा प्रयत्न म्हाडाकडून केला जाणार आहे.
Published on

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

मुंबईत वाढत्या लोकसंख्येमुळे घरांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी पुरवताना दर्जेदार घरांची निर्मिती व परवडणारे दर यांची सांगड घालताना म्हाडाला मोठी कसरत करावी लागत आहे. अशातच अनेकदा खाजगी विकासकांपेक्षा म्हाडाची घरे जास्त किमतीने देखील घ्यावी लागत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार होत आहेत.

यावर आता म्हाडाकडून भविष्यात काढल्या जाणाऱ्या लॉटरीतील घरांच्या किमती सर्वसामान्यांना परवडतील, अशा ठेवण्याचा प्रयत्न म्हाडाकडून केला जाणार आहे. यासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

म्हाडाच्या घरांच्या किंमती होणार कमी? मोठ्या अधिकाऱ्याने दिले संकेत
MVA CM Face: मविआत मुख्यमंत्रिपदावरून तिढा; सीएमपदाचा उमेदवार जाहीर करा, उद्धव ठाकरे यांची जाहीर मागणी

माजी सैनिक या प्रवर्गातून सद्यस्थितीत म्हाडामध्ये सेवेत असलेल्या २२ कर्मचाऱ्यांचा संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, सातत्याने नागरिकांकडून म्हाडांच्या घरांच्या किमती विषयी तक्रारी येत असल्याने शिवाय म्हाडाची राज्यभरात 11193 घरे विक्री विना पडून आहेत. ज्यामुळे म्हाडाचे तब्बल 3110 कोटी रुपये अडकून पडले आहेत, असं जयस्वाल म्हणाले.

म्हाडाच्या घरांच्या किंमती होणार कमी? मोठ्या अधिकाऱ्याने दिले संकेत
Mumbai Dam Water Level: मुंबईकरांनो पाण्याची चिंता विसरा! पुरून उरेल इतका पाणीसाठा जमा; सातही धरणात किती टक्के पाणी?

यामुळे भविष्यात माडांच्या घरांच्या किमती सर्वसामान्यांना कशा परवडतील, असा धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सध्या मुंबईत 2030 घरांसाठीच्या सोडतीतील घरांच्या किमती कमी होणार नाहीत, असेही म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com