Mumbai Latest Crime News, Bandra Police Station
Mumbai Latest Crime News, Bandra Police Station  SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai News: घर मालक बाहेर पडताच मोलकरणीने केलं कपाट साफ; वांद्रे पोलिसांनी ३ महिलांना घेतलं ताब्यात

Shivani Tichkule

संजय गडदे

Mumbai Crime News : मुंबईत उच्चभ्रू वस्तीमध्ये घर कामात मदत करण्यासाठी मोलकरीण ठेवली जाते. मात्र अशाच मोलकरीण महिला तुमचं घर कधी साफ करतील याचा तुम्हाला पत्ता देखील लागणार नाही मुंबईच्या वांद्रे पोलिसांनी अशाच घरकाम करणाऱ्या महिला लुटारू टोळीचा पर्दाफाश केला आहे.

एका तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी धारावी परिसरातून तीन महिला आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 35 लाखांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड आणि घड्याळ जप्त केले. सध्या या तीनही महिला आरोपी वांद्रे पोलिसांच्या (Police) ताब्यात असून यांनी असे इतरत्र कोठे चोरी केली आहे का किंवा या टोळीत अजून कोण कोण महिला सहभागी आहेत याचा वांद्रे (BKC) पोलीस तपास करत आहेत. (Mumbai Cirme News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे कुर्ला संकुलात राहणारे फिर्यादी हे उन्हाळी सुट्टी निमित्त 14 एप्रिल ते सहा मे या काळात मुंबई बाहेर फिरण्यासाठी गेले होते ही बाब त्या घरात काम करणाऱ्या मोलकर्णीला माहिती होती याच संधीचा फायदा घेऊन तिने घराच्या कपाटातील 35 लाखांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड आणि घड्याळ चोरी केले.

फिर्यादी जेव्हा सुट्टी वरून मुंबईत आपल्या घरी परतले तेव्हा घरात कपाटात या वस्तू आढळून आल्या नाहीत म्हणून त्यांनी यासंदर्भात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली . या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एका घरात छापा मारत आरोपींनी लपवून ठेवलेले 35 लाखांचे सोन्याचे दागिने, साडेतीन लाखांची रोकड आणि घड्याळ जप्त केले. अटक करण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला मुंबई उपनगरातील वांद्रे परिसरात एका इमारतीत मोलकरीण म्हणून कार्यरत होती.

ज्या घरात महिला कामावर होती तिथे मालक घराबाहेर काही काळ राहणार असल्याचे तिला समजले. त्यानुसार मोलकरणीने आपल्या इतर 2 महिला साथिदारांसोबत योजना तयार केली. या टोळीने 14 एप्रिल ते 6 मे दरम्यान मालक घराबाहेर असताना घरात चोरी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heat Wave Alert: देशात उष्णतेचा स्फोट! या राज्यात 8 दिवस राहणार उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा

Menstrual Care: मासिक पाळीमध्ये प्रचंड वेदना होतात का? 'हे' उपाय केल्यास पोटदुखी कमी होईल

Lok Sabha Election: काँग्रेसविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, केसीआर यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई

Today's Marathi News Live : ​दिलीप वळसे पाटील यांना उपचारासाठी पुण्यात हालवले

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये Dining Table कुठे असावा? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT