Lok Sabha Election: काँग्रेसविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी, केसीआर यांच्यावर ४८ तासांची प्रचारबंदी; निवडणूक आयोगाची कारवाई

K. Chandrashekar Rao: निवडणूक आयोगाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस अध्यक्ष के यांच्यावर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
K Chandrashekar Rao
K Chandrashekar RaoSaam Tv

K. Chandrashekar Rao:

निवडणूक आयोगाने तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री आणि बीआरएस अध्यक्ष के यांच्यावर आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच चंद्रशेखर राव यांच्यावर ४८ तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे. काँग्रेस नेते जी निरंजन यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आयोगाने हा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये केसीआर यांच्यावर काँग्रेसविरोधात अपमानास्पद आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप होता.

निवडणूक आयोगाने एका निवेदनात म्हटले आहे की, बीआरएसचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत घेत वादग्रस्त वक्तव्य करत आदर्श आचारसंहिता भंग केला, याची आयोग निंदा करतो.

K Chandrashekar Rao
Maharashtra Politics: राज्यात एक मंत्रिपद आणि विधानसभा निवडणुकीत RPI ला 10 जागा मिळणार: रामदास आठवले

घटनेच्या कलम 324 चा हवाला देत आयोगाने के चंद्रशेखर राव यांना आज रात्री 8 वाजल्यापासून 48 तासांसाठी कोणतीही जाहीर सभा, सार्वजनिक मिरवणूक, सार्वजनिक रॅली, कार्यक्रम आणि मुलाखती, मीडिया (इलेक्ट्रॉनिक, प्रिंट, सोशल मीडिया) मध्ये जाहीर भाषण करण्यास मनाई केली आहे.

K Chandrashekar Rao
Maharashtra Politics: आमचं सरकार आलं तर शेती अवजारांवर कोणताही टॅक्स आणि जीएसटी द्यावा लागणार नाही: जयंत पाटील

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, 5 एप्रिल रोजी सिरिल्ला येथे पत्रकार परिषदेत राव यांनी केलेले भाष्य आदर्श आचारसंहिताचे उल्लंघन करणारे होते. काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यानंतर, राव हे दुसरे नेते आहेत, ज्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर ४८ तासांची बंदी घालण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com