Maharashtra Politics: राज्यात एक मंत्रिपद आणि विधानसभा निवडणुकीत RPI ला 10 जागा मिळणार: रामदास आठवले

Athawale Ramdas News: आरपीआयला एक मंत्रिपद राज्यात आणि विधानसभा निवडणुकीत 10 जागा देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. केंद्रात एक मंत्रिपद आम्हाला मिळेल, असं केंद्रीय मंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले आहेत.
Saam Tv
Ramdas AthawaleSaam tv

Athawale Ramdas News:

>> अक्षय बडवे

आमची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणी झाली आहे. आरपीआयला एक मंत्रिपद राज्यात आणि विधानसभा निवडणुकीत 10 जागा देण्याचं त्यांनी मान्य केलं आहे. केंद्रात एक मंत्रिपद आम्हाला मिळेल, असं केंद्रीय मंत्री आणि आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले आहेत. पुण्यात एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''प्रकाश आंबेडकर आमच्या समाजातील ज्येष्ठ आणि अभ्याससू नेते आहे. कधी काय करायचं, त्यांना चांगल माहिती आहे. मात्र त्यांना येणाऱ्या निवडणूकित यश मिळणार नाही.''

Saam Tv
Maharashtra Politics: आमचं सरकार आलं तर शेती अवजारांवर कोणताही टॅक्स आणि जीएसटी द्यावा लागणार नाही: जयंत पाटील

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना आठवले म्हणाले, ''शरद पवार यांना मी दिल्लीत रोज भेटतो. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी, आमची मैत्री ही बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री होती, तशीच आमची देखील आहे. भविष्यात अजून त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मी करणार. आता अजित पवार आमच्यासोबत आले आहेत. शरद पवार राहिले, भविष्यात विचार करू.''

'अजित पवार यांच्यासोबत पॉवर, तर सुप्रिया सुळे यांच्यासोबत पवार'

बारामतीमधूल पवार विरुद्ध पवार संघर्षावर ते म्हणाले की, ''पवार विरुद्ध पवार हा संघर्ष व्हायला नको होतो. 3 वेळा निवडणूक लढवल्या असल्यामुळे सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीला उभे नव्हतं राहायला पाहिजे. मागच्या वेळी कांचन कुल होत्याच, आता अजित पवारांचे मत त्यामध्ये वाढतील. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार निवडून येतील. अजित पवार यांच्यासोबत पॉवर आहे, तर सुप्रिया सुळे यांच्यासोबत पवार आहेत.''

Saam Tv
Maharashtra Lok Sabha : महायुतीचा महाफॉर्म्युला फायनल! पक्ष, उमेदवार आणि प्रमुख लढतींचं चित्र स्पष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''मोदींच्या सभांना चंगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात 40 जागा आमच्या नक्की निवडून येतील. नरेंद्र मोदी यांचा आत्मा भटकत आहे, असं संजय राऊत म्हणतात. त्यांना उद्धव ठाकरे यांनी केवळ आरोप करण्यासाठी ठेवले आहे. राज्याचा खेळ खंडोबा यांनी केला आहे.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com