काल लातूरमध्ये नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली, त्यावेळी मोदींनी काँग्रेस वर सडकून टीका केली. काँग्रेस पक्ष देशाला असुरक्षित करण्याचे काम करत आहे . ते वर्षाला एक -एक पंतप्रधान करतील, काँग्रेसचा खूप मोठा प्लॅन सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर आज नाना पटोळे यांनी लातूर येथे पत्रकार परिषद घेत, नरेंद्र मोदी खोटं बोलण्यामध्ये एक्सपर्ट आहेतकधी महिलांचे मंगळसूत्र काडतात तर कधी हिंदू मुस्लिम करतात. मोदींनी दहा वर्षात काय केले ते सांगाव. त्यांच्या बोलण्यात कसलंही तथ्य नाही असा पलट वार नाना पटोले यांनी आज लातूर येथे पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना केला आहे.
मुंबई लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढू लागला असून सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांसाठी मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातही आज उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यासाठी महाविकास आघाडी कार्यकर्त्यांचा मेळाव्याचा आयोजन करण्यात आलं आहे. जोगेश्वरी पूर्वेकडील अरविंद गंडभीर हायस्कूलच्या प्रांगणात या मेळाव्याला सुरुवात झाली.
- ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर उमेदवारी अर्ज भरणार आहेत
- उद्या सकाळी 8.30 वाजता दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी येतील
- चैत्यभूमीला बाबासाहेबांना अभिवादन करून मातोश्रीवर रश्मी ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जातील.
- मातोश्रीवरून आदित्य ठाकरे यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरायला जातील
- महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या इचलकरंजीतल्या सभेत हाउसफुल गर्दी
- उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये झाली चेंगराचेंगरी
- सभास्थळ नागरिकांनी भरून गेल्याने मिलिंद नार्वेकरांनी पोलिसांना विनंती करत डी झोनमध्ये नागरिकांना बसवण्याची केली विनंती
- नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने शरद पवारांनी काही काळ भाषण थांबवलं
- डी झोन मध्ये जाण्यासाठी नागरिकांची गडबड
- अनेक नागरिक चेंगराचेंगरीत कोसळले जमिनीवर
- अनेक नागरिक खाली पडल्याने गर्दीने नागरिकांना तुडवलं
- दिलीप वळसे पाटील यांना उपचारासाठी पुण्यात हालवले
- रुटिंग चेकअपसाठी पुण्यात हालविल्याची माहिती
- दोन दिवसांपूर्वी मंचर येथील निवासस्थानी आणण्यात आले होते
- काल दिवसभर मतदारसंघातील नागरिकांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली
- आज दुपारनंतर तब्येतीत काही बिघाड झाल्यानंतर रुटींग चेकअपसाठी त्यांना पुण्यात पाठविण्यात आले
- हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर
- दोन तासांनंतर लोकलसेवा पूर्वपदावर आली
- लोकल रुळावर आणण्यात यश
- सीएसएमटी स्थानकाजवळ लोकल रुळावरून घसरली होती
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रत्नागिरी दौ-यावर
- 3 मे रोजी अमित शहा रत्नागिरीत येणार
- महायुती उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी अमित शहा रत्नागिरीत येणार
- 3 मे रोजी दुपारी 1 वाजता रत्नागिरीतील गोगटे काँलेज मैदानावर होणार सभा
- वाघनख महाराष्ट्रात येणं लांबल
- 10 जूनपर्यंत वाघनखा महाराष्ट्रात येण्याची शक्यता.
- सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
- आचारसंहिता संपताच पुढील प्रक्रिया होईल
- संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ सांगलीत दाखल
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कवलापूर विमानतळावर दाखल
- शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी योगी आदित्यनाथ यांची कवलापूर विमानतळावर घेतली भेट
- - संजयकाका पाटील हे सांगली लोकसभेतील भाजपाचे उमेदवार
- मी लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार
- शिवसेनेचे मुंबईतील उमेदवारांना निवज
- २ दिवसांत शिवसेनेत प्रवेश करणार
- मी २० वर्षांनंतर घरवापसी करणार
- महाविकास आघाडीचे उत्तर मुंबईचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार भूषण पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार
- कालच भूषण पाटील यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी जाहीर केली
- २ मे रोजी सकाळी ११ वाजता काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरणार
- भूषण पाटील यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचे असणार आव्हान
- उत्तर मुंबईच्या जागेवर यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून गावा करण्यात आला होता
- मंत्री दादा भुसे छगन भुजबळांच्या भेटीला
- नाशिकच्या भुजबळ फार्म येथील कार्यालयात झाली भेट
- काल भाजपने नेते गिरीश महाजन आज सकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर दादा भुसेंनी घेतली भुजबळांची भेट
- हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दादा भुसे आणि भुजबळ यांच्यात बंद दाराआड चर्चा
- महंत अनिकेत शास्त्री यांची नाशिकच्या निवडणुकीतून माघार
- हेमंत गोडसे यांची महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानं अनिकेत शास्त्री यांचा हेमंत गोडसेंना पाठिंबा
- पक्ष श्रेष्ठींनी हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं माघार घेत असल्याची अनिकेत शास्त्री यांची प्रतिक्रिया
- चीनमध्ये भीषण अपघाताची घटना घडली
- महामार्ग ५८ फूट खचून १९ जणांचा मृत्यू
- चीनच्या दक्षिणेकडील ग्वांगडोंग प्रांतातील घटना
- २० वाहनं ढिगाऱ्याखाली अडकली
- भक्त परिवार यांनी निवडणूक लढवण्याचे निर्णय घेतले होते
- आम्ही निवडणूक लढणार आणि जिंकणार
- तिकीट नाही मिळाले तरी निवडणूक लढणार
- 7 लोकसभा मतदारसंघात आम्ही निवडणूक लढणार का? यावर बैठकीत निर्णय घेणार
- तळेगांव (श्यामजी पंत) येथील घटना
- अर्जून दिंडेकर यांच्या शेतातील संत्रा बागेच मोठ्या प्रमाणात नुकसान
- काही संत्रा झाड वादळात मुळासकट जमीनदोस्त
- दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळ, अवकाळी पावसाने शेतकऱ्याची कंबर मोडली
- संत्र्याला बहर येत असताना झाड जमीनदोस्त झाल्यानं अंदाजे पाच लाखांच नुकसान
- नुकसान भरपाई मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने केला आत्महत्येचा प्रयत्न
आत्महत्या करणाऱ्याची प्रकृती गंभीर
अनुज स्थापन असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्षाचे काम न केल्यानं युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवारसह ५० पदाधिकाऱ्यांना नोटीस
पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी न होणे, युवक काँग्रेसच्या उपक्रमात सक्रिय सहभाग न घेणे या कारणासाठी नोटीस
चंद्रपूर लोकसभेसाठी शिवानी वड्डेटीवार या इच्छुक होत्या
- दिंडोरी लोकसभेत महत्त्वाची राजकीय घडामोड
- भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी
- दिंडोरी लोकसभेतून अपक्ष निवडणूक लढवणार
- हरिश्चंद्र चव्हाण उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार
- २०१९ ला हरिश्चंद्र चव्हाण यांना डावलून भारती पवार यांना देण्यात आली होती उमेदवारी
माजी आमदार परशुराम उपरकर हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. उपरकर हे उद्या मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा 3 मे ला सिंधुदुर्ग दौरा होत आहे. या दौऱ्यात ते प्रवेश करण्याची शक्यता आहे.
येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी कल्याणमधील नूतन विद्यालयाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र दिन , कामगार दिन आणि छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणावर ८० फूट बाय ८० फूट आकाराची भव्य रांगोळी साकारली . २० मे रोजी होणाऱ्या लोकसभा मतदान जनजागृतीसाठी पालक मतदारांना जागृत करण्यासाठी या महारांगोळीचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांनी विश्वास दाखवला. दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडू. गेली दहा वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे ग्रामीण भागातही पोहोचलो आहे. अनेक जागांवर तिढा होता, नाशिकचाही सामावेश होता. महायुतीच्या नेत्याचे आभार मानतो. सातत्याने लोक संपर्कात आहे. मला विश्वास आहे की, दोन ते तीन लाखांनी विजयी होणार आहे, असे नाशिकमधील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे म्हणाले.
नालेसफाई आणि कंत्राटदाराच्या कामावर पालिकेचे राहणार बारीक लक्ष
नालेसफाईच्या कंत्राटदारांनी नालेसफाई करण्यापूर्वीचा व्हिडिओ आणि नालेसफाई केल्यानंतर व्हिडिओ पालिकेला पाठवावे लागणार
कंत्राटदारांनी पालिकेला दररोजचा रिपोर्ट सॉफ्टवेअरमार्फत भरण्याचे दिल्या सूचना
नाल्यातून गाळ काढण्याच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर पालिकेने केली दंडात्मक कारवाई
आतापर्यंत एकूण ३० लाख ८३ हजार रूपयांची दंडात्मक कारवाई
आतापर्यंत 61 टक्के नालेसफाई पूर्ण
- भुजबळांसोबत महाजन, बावनकुळे यांची बैठक होऊनही भुजबळ समर्थक उमेदवारीवर ठाम?
- भुजबळ निवडणूक रिंगणात नसल्यानं समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम?
- ३ ऑक्टोबरला नाशिकमध्ये समता परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप खैरे उमेदवारी अर्ज भरणार
- दिलीप खैरे हे छगन भुजबळांचे अत्यंत विश्वासू सहकारी
- मोदींसाठी सर्वांची नाराजी दूर केली जाईल अशी प्रतिक्रिया भुजबळ देत असले तरी समर्थक उमेदवारीवर ठाम
'लोकसभेच्या सर्व जागांचा तिढा सुटलेला आहे. बहुचर्चित नाशिक लोकसभेत अनेकांना प्रश्न पडलाय. ही जागा शिवसेनेकडे आहे. काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवारांची घोषणा करणार आहेत. उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे, असे संजय शिरसाट म्हणाले.
पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. 1 मे रोजी सुट्टी निमित्ताने पर्यटक घराबाहेर पडले आहेत. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहतूक संथ सुरू आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. अवजड वाहने आणि हलकी वाहनांची संख्या वाढल्याने बोरघाटात वाहतूक संथ सुरू आहे..
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे उमेदवार छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन समाजवादी पक्षाने (सपा) केले आहे.
यासंदर्भात समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी बुधवारी खुले पत्र लिहिले आहे. त्याव्दारे त्यांनी कोल्हापूर परिसरातील सपा कार्यर्त्यांना आवाहन केले आहे.
पुणे -बेंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.
साताऱ्यातील कराडजवळ तासभर वाहतूक ठप्प
सुट्ट्यामुळे कोकणात जाणारी वाहने वाढली
कराड-कोल्हापूर रस्ता ठप्प
महायुतीचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर शेवटच्या दिवशी 3 मे रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार
वायकर शुक्रवारी सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरणार
वायकर यांच्यासमोर महाविकास आघाडीचे अमोल कीर्तिकर यांचे आव्हान
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज सोलापूर दौऱ्यावर आहेत.
- सोलापुरातील वल्ल्याळ मैदानावरती योगी आदित्यनाथ यांची सभा आयोजित करण्यात आली.
- सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली.
- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील या सभेला उपस्थित असणार आहेत.
वेगळ्या विदर्भाच्या मागणीला घेऊन विदर्भवाद्यांनी आज संविधान चौकात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी जोरदार घोषणा दिल्यात...
1 मे महाराष्ट्र दिन विदर्भवादी काळा दिवस म्हणून साजरा करतात, आजही विदर्भवादी यांनी संविधान चौकात एकत्र आले..
वेगळ्या विदर्भाचा झेंडा हातात घेवून वेगळ्या विदर्भ झाला पाहिजे अशा घोषणा देत यावेळी मागणी लावून धरली.
यावेळी विदर्भ मागासलेला आहे, असा आरोप करण्यात आला
ठाणे लोकसभा शिवसेनाचं लढणार आहे.
नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कामोर्तब
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हुतात्मा चौकात पोहोचले.
पुष्पहार अर्पण करून हुतात्म्यांना केलं अभिवादन
मनसे नेते नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, संदीप देशपांडे, अमीत ठाकरे उपस्थित
भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजपचे मुंबई उत्तर मध्यचे उमेदवार उज्वल निकम देखील उपस्थित
सांगलीचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस आज कारवाई करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेस हायकमांड आज प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांना विशाल पाटील यांच्यावर कारवाईची सूचना करणार,सूत्रांची माहिती
काँग्रेस पक्षाने विशाल पाटील यांना दिलेला अल्टीमेटम आज संपणार
विशाल पाटील यांना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची हायकमांडनं केली होती सूचना
- नाशिकच्या सिडको परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट
- सिलिंडर स्फोटाचा थरारक व्हिडिओ समोर
- स्फोटात तीन जण जखमी तर एक जण गंभीर असल्याची माहिती
- सिडकोच्या चौपाटी येथील सोमवारी मध्यरात्रीची घटना
- सिडकोच्या चौपाटी परिसरातील खाद्यपदार्थांची दुकानांच्या लेनमध्ये घडली घटना
- आग विझविण्याचा प्रयत्न करणारा अग्निशामक दलाचा एक जवान देखील स्फोटात जखमी
- नाशिक पोलीस करतायत घटनेची अधिक चौक
दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे.
दिल्लीतील अनेक शाळांना सुट्टी दिल्याची माहिती
मयुर विहारमधील मदर मेरी शाळेला धमकी मिळाल्याची पोलिसांची माहिती
द्वारका मधील डीपीएस शाळेलाही धमकी
पहाटे 4.30 वाजता मेल मिळाल्याची माहिती
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.